परिवहन विभागाचे नियंत्रक आणि डेपो व्यवस्थापक यांची चौकशी करण्याचे आदेश
विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune rape case पुण्यातील स्वागरगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणाची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरून काढून टाकण्यात आले. याचबरोबर आजपासून तातडीने नवीन सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच परिवहन विभागाचे नियंत्रक आणि डेपो व्यवस्थापक यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. Pune rape case
सरनाईक म्हणाले की, आम्ही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि एसीएससोबत बैठक बोलावली आहे. सार्वजनिक वाहतुकीत महिलांची सुरक्षा मजबूत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून नियम अधिक कडक केले जातील. अनेक वर्षांपासून निष्क्रिय पडलेल्या भंगार वाहनांमध्ये अशा घटना घडत आहेत आणि आता त्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आज मंत्रालयात या विषयावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित महिला सकाळी फलटणला जाण्यासाठी बस डेपोमध्ये आली होती. दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या आरोपीने तिला दिशाभूल केली, चुकीच्या बसमध्ये बसवले आणि तिच्यावर बलात्कार केला. स्वारगेट पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या या डेपोमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर पीडितेने तिच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले तेव्हा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर हे प्रकरण वाढले आणि आता परिवहन मंत्र्यांनी ही मोठी कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App