विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यावरून संजय राऊत यांनी गोऱ्हे यांना निर्लज्ज, विश्वासघातकी बाई असे म्हटले.संजय राऊत यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. यावर आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.Sanjay Raut
Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा
चित्रा वाघ म्हणाल्या की, “नीलम गोऱ्हे या संविधानिक पदावर आहेत. संविधानिक पदही जाऊ द्या, पण एका महिलेबद्दल संजय राऊत हे इतक्या घाणेरड्या भाषेत बोलतात. महिलांबद्दल अतिशय वाईट बोलणे आणि त्यांना अश्लील शिव्या देणे हा संजय राऊतांचा इतिहास आहे,” अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या वैचारीकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे संविधानिक पदावर असणाऱ्या नीलम ताई गोऱ्हे संविधानिक पद ही जाऊ द्या पण एका महिलेबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत हे संजय राऊत बोलतात. संजय राऊतांचा इतिहास आहे महिलांबद्दल अतिशय वाईट बोलणं त्यांना अश्लील शिव्या देणं… pic.twitter.com/dqhNXylCzx — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 24, 2025
महाराष्ट्राच्या वैचारीकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे
संविधानिक पदावर असणाऱ्या नीलम ताई गोऱ्हे संविधानिक पद ही जाऊ द्या पण एका महिलेबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत हे संजय राऊत बोलतात.
संजय राऊतांचा इतिहास आहे
महिलांबद्दल अतिशय वाईट बोलणं त्यांना अश्लील शिव्या देणं… pic.twitter.com/dqhNXylCzx
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 24, 2025
“स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या अश्लील शिवीगाळीची संजय राऊत यांची क्लीप आजही समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. अशा नाठाळ संजय राऊतांना आता महाराष्ट्रातील महिलांनीच वठणीवर आणण्याची गरज आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App