..हा कार्यक्रम केवळ ठराविक घटकापूरता न राहता लोकांचा कार्यक्रम होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, साहित्य संमलेनाच्या समारोपप्रसंगी अजित पवारांचे विधान
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ajit Pawar येथे पार पडलेल्या तीन दिवसीय ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अजित पवार म्हणाले, चार शतकांपूर्वी मराठा पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या तालकटोरा मैदानाच्या ऐतिहासिक भूमीत हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला, याचा आनंद आहे. मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरेला नवचैतन्य मिळवून देणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रप्रेमींनी मोठ्या संख्येनं लावलेली हजेरी म्हणजे मराठी अस्मितेचा गौरवच आहे.Ajit Pawar
मराठी भाषिक, इंजिनियर, डॉक्टर, आर्किटेक्ट, चित्रकार, शिल्पकार, चित्रपट-नाट्य क्षेत्रातले कलावंत, लोककलावंत, शेतकरी, कष्टकरी अशा सगळ्यांचं, मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमातला सहभाग वाढवला पाहिजे. हा कार्यक्रम केवळ ठराविक घटकापूरता न राहता लोकांचा कार्यक्रम होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा वारसा, सीमा भागाचा स्वाभिमान जपणारी, छत्रपती शिवाजी महाराजांची, माझी, तुमची, आपणा सर्वांची माय मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, प्रचारासाठी, प्रसारासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही.
मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल अभिमान-स्वाभिमान बाळगणारी, महाराष्ट्र गौरवासाठी काम करणारी, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेली सगळी महाराष्ट्राभिमानी मंडळी गेले तीन दिवस आस्थेनं, निष्ठेनं, मराठी भाषेच्या प्रेमापोटी संमेलनात सहभागी झाली. ह्या मराठी भाषेवरच्या प्रेमाबद्दल, महाराष्ट्रप्रेमाबद्दल, महाराष्ट्राभिमानाबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आभार मानतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App