Atishi : आतिशी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड, दिल्ली विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू

Atishi

आप’चा अजेंडा काय असेल ते जाणून घ्या?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Atishi  आतिशी यांची दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. रविवारी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अरविंद केजरीवाल, आतिशी सिंह, गोपाल राय हे देखील उपस्थित होते. आम आदमी पक्षाचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते.Atishi



बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोपाल राय म्हणाले की, आतिशी या विरोधी पक्षनेत्या असतील. सर्व आमदारांनी त्यांना निवडून दिले आहे. आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्रीही राहिल्या आहेत. गोपाल राय म्हणाले की, आम आदमी पक्षाने केलेली जी कामं आहेत, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्हाला पार पाडावी लागेल. तसेच भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण करून घेणे ही आमच्या विरोधी पक्षनेत्याची दुहेरी जबाबदारी असेल.

आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील जनतेने आम आदमी पक्षाला विरोधी पक्षाची भूमिका दिली आहे. मजबूत विरोधी पक्ष म्हणजे काय? हे कामामधून आम्ही दाखवू. मोदीजी म्हणाले होते की हे पहिल्या मंत्रिमंडळात मंजूर केले जाईल आणि ८ मार्च रोजी महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा केले जातील. हे आश्वासन पूर्ण करून घेणे हा आमचा अजेंडा असेल.

Atishi elected as Leader of Opposition Delhi Assembly session begins tomorrow

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात