Madan Rathore : भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्ष पदावर मदन राठोड यांची बिनविरोध निवड!

Madan Rathore

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


विशेष प्रतिनिधी

जयपूर : Madan Rathore राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मदन राठोड यांची पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर, मदन राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, निवडणूक अधिकारी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांचे अभिनंदन केले.Madan Rathore

प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर मदन राठोड म्हणाले की, ‘हे पद नाही तर जबाबदारी आहे. मी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी काम करेन. मी वरिष्ठ नेतृत्वाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.’ तसेच , ‘पक्षातील सक्षम कार्यकर्त्यांचा मी वापर करेन, कारण ते आमचे भांडवल आहेत. मी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक घेईन आणि आपली टीम आणखी कशी मजबूत करायची यावर चर्चा करेन. असेही त्यांनी सांगितले.

मदन राठोड हे राजस्थान भाजपमधील एक प्रभावी नेते आहेत. सध्या ते ७० वर्षांचे असून राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १९७० पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. १९८० च्या दशकाच्या मध्यात ते भाजपमध्ये सामील झाले. भाजपच्या पाली जिल्हा शाखेत विविध पदांवर काम केल्यानंतर ते राज्य शाखेत सामील झाले. प्रथम त्यांनी २००३ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि आमदार झाले आणि नंतर २०१३ मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले.

Madan Rathore elected unopposed as BJPs Rajasthan state president

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात