जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shivraj Singh Chouhan केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या तक्रारीनंतर विमान कंपनी एअर इंडियाने माफी मागितली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर विमान कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. शिवराजसिंह चौहान यांनी एअर इंडियावर विमान प्रवासादरम्यान तुटलेली सीट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विमान कंपनीला केंद्रीय मंत्र्यांची माफी मागावी लागली Shivraj Singh Chouhan
केंद्रीय मंत्र्यांच्या तक्रारीला उत्तर देताना एअर इंडियाने म्हटले आहे की, “तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते. भविष्यात अशी कोणतीही घटना टाळण्यासाठी आम्ही या प्रकरणाची काळजीपूर्वक चौकशी करत आहोत, याची खात्री बाळगा.”
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, “आज मला भोपाळहून दिल्लीला यावे लागले, पुसा येथील किसान मेळ्याचे उद्घाटन करावे लागले, कुरुक्षेत्रातील नैसर्गिक शेती अभियानाच्या बैठकीला उपस्थित राहावे लागले आणि चंदीगडमधील शेतकरी संघटनेच्या सन्माननीय प्रतिनिधींशी चर्चा करावी लागली. मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 वर तिकीट बुक केले होते आणि मला 8C क्रमांकाची सीट मिळाली. मी जाऊन सीटवर बसलो, मात्र ती तुटलेली आणि आतून खोलगट झालेली होती. त्यावर बसणे वेदनादायक होते.”
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, जेव्हा मी एअरलाइन कर्मचाऱ्यांना विचारले की जर सीट खराब असेल तर ती का दिली? त्यांनी उत्तर दिले की व्यवस्थापनाला आधीच कळवण्यात आले होते की ही जागा चांगली नाही आणि तिचे तिकीट विकले जाऊ नये. अशी एकच जागा नाही तर अनेक जागा आहेत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, माझ्या सहप्रवाशांनी मला जागा बदलून चांगल्या जागेवर बसण्याची विनंती केली होती पण मी माझ्यासाठी दुसऱ्याला का त्रास देऊ आणि मग मी ठरवले की मी याच जागेवर बसून माझा प्रवास पूर्ण करेन.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App