PM Modi : ‘RSSमुळेच मी मराठी भाषा अन् संस्कृतीशी जुडू शकलो’, पंतप्रधान मोदींचं विधान!

PM Modi

जाणून घ्या, पंतप्रधान मोदींनी आणखी काय म्हटलं?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की संघामुळेच मी मराठी भाषा शिकलो आणि संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळाली.PM Modi

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आभार मानले आणि सांगितले की त्यांच्या कार्यकाळातच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, ही एक मोठी उपलब्धी आहे. जगभरातील १२ कोटी मराठी भाषिक याची वाट पाहत होते असे मोदी म्हणाले.

विज्ञान भवन येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संघामुळेच मी मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडला जाऊ शकलो. काही महिन्यांपूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. जगात १२ कोटींहून अधिक लोक मराठी बोलतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची संधी मला मिळाली आणि मी ते माझे भाग्य मानतो.

मराठी संस्कृती आणि भाषा शिकण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघ तरुणांना भारतीय संस्कृतीचा उपदेश करण्यासाठी सांस्कृतिक ‘यज्ञ’ करत आहे.

PM Modi said that RSS was the reason I was able to connect with Marathi language and culture

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात