विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुर्चीत बसविले, त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला, याविषयी मराठी माध्यमांमध्ये सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना टोले हाणले.Sanjay Raut
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या साहित्य संमेलनातल्या वर्तनाविषयी तुमचे मत काय??, असे पत्रकारांनी विचारताच संजय राऊत यांनी पवारांविषयी पंतप्रधान मोदींना वाटत असलेला आदर आणि सन्मान हा व्यापार आणि ढोंग आहे असा घणाघाती हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी शरद पवारांचा उल्लेख “भटकता आत्मा” असा करून मोदींच्या जुन्या प्रचाराची आठवण करून दिली. पंतप्रधान मोदी साहित्य संमेलनात भटकत्या आत्म्याशेजारी कसे काय बसले?? पंतप्रधान कार्यालयाने त्यांना त्या भटकत्या आत्म्याशेजारी कसे काय बसू दिले??, असा बोचरा सवाल राऊत यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी आपल्याला नेहमीच आदर आणि सन्मान राहिला, असे पंतप्रधान मोदी नेहमीच भाषणात म्हणतात. परंतु, त्याच बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना मोदींनी फोडली. पवारांविषयी त्यांनी आदर व्यक्त केला, पण पवारांनीच निर्माण केलेली राष्ट्रवादी काँग्रेस देखील मोदींनी फोडली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांविषयी मोदींचा आदर आणि सन्मान हे व्यापार आणि ढोंग आहे. मराठीत देखल्या देवा दंडवत अशी म्हण आहे, अशा तिखट शब्दांमध्ये संजय राऊत यांनी शरसंधान साधले.
पण त्या आधीच शरद पवार हे मोदींपेक्षा ज्येष्ठ आहेत. कुणी एखाद्या पदावर बसले किंवा अगदी पंतप्रधान पदावर बसली, तरी ती ज्येष्ठता त्यांच्याकडे येत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App