‘मागील भ्रष्ट सरकारला जनतेच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यावा लागेल’

मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रेखा गुप्ता आज (२० फेब्रुवारी) दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर होणार आहे. शपथ घेण्यापूर्वी रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान मोदी आणि वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. तसेच, त्या म्हणाल्या, ‘मागील भ्रष्ट सरकारला जनतेच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यावा लागेल.

यावेळी रेखा गुप्ता म्हणाल्या की, माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माझ्यासारख्या साध्या कुटुंबातून आलेल्या मुलीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानते. मी माझ्या सर्व क्षमतेने, ताकदीने आणि प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडेन.

रेखा गुप्ता पुढे म्हणाल्या की, माझी पहिली प्राथमिकता आमच्या पक्षाने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणे आहे आणि दुसरी प्राथमिकता म्हणजे आमचे सर्व ४८ आमदार टीम मोदी म्हणून काम करतील. मी कधीच विचार केला नव्हता की मी दिल्लीचा मुख्यमंत्री होईन… आम्ही लोकांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील.

Rekha Guptas first reaction after being elected as Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात