प्रतिनिधी
मुंबई : Matoshree विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत. यातच उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी पक्षाला घरचा आहेर देत मातोश्रीवर ताबा मिळवला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पक्षाच्या वतीने आता त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.Matoshree
यासंबंधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी पक्षातील नेत्यांवरच आरोप केले होते. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मातोश्री आणि सेना भवनावर शिवसेना नेते विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर या सारख्या नेत्यांनी ताबा मिळवला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराजयाची जबाबदारी निश्चित करून जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी लावणाऱ्या या नेत्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली होती. किशोर तिवारी यांनी दिलेल्या या घरच्या आहेरानंतर त्यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या संबंधात किशोर तिवारी यांनी देखील पक्षाच्या या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नागपूर जिल्ह्याचे किशोर तिवारी यांना प्रवक्ते पदावरून पदमुक्त केले
किशोर तिवारी हे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते होते. त्यांना पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्याचे किशोर तिवारी यांना प्रवक्ते पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
चळवळीच्या कार्यकर्त्याला साधी सूचना न देता सरळ हकालपट्टी किती योग्य
हकालपट्टी केल्यानंतर किशोर तिवारी यांनी हे किती योग्य आहे? असा प्रश्न विचारला असून यासंबंधी ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंना शिवसेना मध्ये विनायक राऊत अरविंद सावंत संजय राऊत मिलिंद नार्वेकर सारख्या नेत्यांनी मातोश्री व सेना भवनावर केलेल्या ताबा मिळवून, विधान सभा निवडणुकी मध्ये पराजय करण्यात जबाबदारी निश्चित न करीत जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास लावणाऱ्या पोटभरू कावेबाज नेत्यांना हकालपट्टी करा ही मागणी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केल्यावर, मुलाखती नंतर तडका फडकी किशोर तिवारी यांची हकालपट्टी आज रात्री करण्यात आली आहे. जो माणूस सत्य बोलण्याचे धाडस करतो, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मागील पाच वर्षांपासून सतत राहून भाजपच्या सर्व प्रवक्त्या मंडळींनी त्यांची जागा दाखविणाऱ्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला साधी सूचना न देता सरळ हकालपट्टी किती योग्य आहे, हे आपण सांगा..’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App