जाणून घ्या, शपथविधी सोहळ्याची तारीख कोणती असेल?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Delhi दिल्लीतील निवडणूक निकालानंतर आता सर्वांना नव्या सरकारची प्रतीक्षा आहे. अडीच दशकानंतर भाजपने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली आहे. तर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल याबाब अद्याप सस्पेन्स आहे, मात्र लवकरच आता नवीन सरकारच्या शपथविधी समारंभ होवू शकतो. यासाठी १९ किंवा २० फेब्रुवारी या दिवसांची चर्चा आहे. तर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान मोदी घरी परतल्यानंतरच घेतला जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.Delhi
पंतप्रधान मोदी भारतात परतताच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बैठक घेतील, असे सांगण्यात येत आहे. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असतील यावर शिक्कामोर्तब होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री अमेरिकेहून दिल्लीला पोहोचणार आहेत. यानंतर दिल्लीतल सरकार स्थापनेबाबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते देखील या बैठकीस उपस्थित राहतील.
या नेत्यांच्या बैठकीत दिल्लीत सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. तर अशीही माहिती समोर येत आहे की, दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने आमदारांच्या नावांची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये ४८ पैकी १५ आमदारांच्या नावांना प्राधान्य देण्यात आले आहे. या १५ आमदारांपैकी ९ जणांची नावे अंतिम केली जातील, ज्यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि सभापतींची नावे निश्चित केली जातील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App