Mahakumbh : ‘महाकुंभ’बाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे सपा खासदारावर गुन्हा दाखल

Mahakumbh

खासदार अफजल अन्सारी अडचणीत ; जाणून घ्या, काय म्हणाले होते?


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : Mahakumbh  उत्तर प्रदेशातील गाजीपूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी महाकुंभमेळ्याबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी शादियााबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष देवप्रकाश सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे.Mahakumbh

अफझल अन्सारी यांन शादियााबादमध्ये म्हटले होते की, संगमात स्नान केल्याने माणसाचे पाप धुऊन जातात असे मानले जाते. पापे धुऊन जातील, म्हणजेच वैकुंठाला जाण्याचा मार्ग मोकळा होईल. अशावेळी तिथे होत असलेल्या गर्दीवरून असे दिसते की आता कोणीही नरकात राहणार नाही आणि तिकडे हाऊसफुल्ल असेल.



तसेच अन्सारी यांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांच्या प्रचंड गर्दीवरही भाष्य केले, ते म्हणाले रेल्वेची अवस्था अशी आहे की लोक काचा फोडत आहेत आणि आतील महिला भीतीने थरथर कापत आहेत. पोलीसही त्रस्त आहेत आणि टीटीने त्याचा काळा कोट काढून त्याच्या बॅगेत ठेवला आहे. कारण, त्याला भीती आहे की जमाव आपल्यालाही मारहाण करू शकतो.

ते म्हणाले की, मी स्वतः पाहिले की रेल्वेगाड्यांची तोडफोड करणारे १५ ते २० वयोगटातील आहेत. गर्दी इतकी होती की या लोकांना त्याचा अंदाजच येत नव्हता. चेंगराचेंगरीत किती लोक मरण पावले कोणास ठाऊक पण नेमकी संख्या आजपर्यंत कळलेली नाही. परतणारे लोक मृत्युच्या दृश्याचे वर्णन करत आहेत.

Case registered against SP MP for making controversial statement regarding ‘Mahakumbh’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात