Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका- राहुल गांधी दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस: 2019च्या घटनाक्रमावरही केला गौप्यस्फोट

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांना तुम्ही कितीही खरे सांगा, ते अजिबात ऐकत नाहीत. ते दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 2019 च्या घटनाक्रमाबाबत देखील मोठा गौप्यस्फोट केला. अमित शहांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री नाकारले होते, त्यानंतर मीच त्यांना उपमुख्यमंत्रीपद ऑफर केले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.Devendra Fadnavis



उद्धव ठाकरेंना मी उपमुख्यमंत्रिपद ऑफर केले होते

2019 च्या घटनाक्रमाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही युतीसाठी बसलो होतो. आमची युती फायनल झाली होती. पण एका रात्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितले, “देवेंद्रजी, आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे. मी तुमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे. आता अंतिम निर्णय आज करू. आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवे आहे. रात्री 1 वाजता उद्धव ठाकरे मला बोलले.” मी म्हटले, मी याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही. माझा पक्ष संसदीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेतो. आमचे अध्यक्ष अमित शाह आहेत. मी अमित शाह यांच्याशी बोलतो. त्यानंतर मी अमित शाह यांना रात्री 1 वाजता फोन केला. ते जागे होते. मी त्यांना म्हटलं आपलं सीट शेअरिंग फायनल झालं आहे. पण उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवं. अमित शाह म्हणाले, ते मंजूर नाही. तुम्ही त्यांना सांगा आम्हाला मंजूर नाही, असे उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यावेळी मी त्यांना, मागच्यावेळी आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद दिले नव्हते. यावेळी तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद देऊ शकतो, असेही सांगितले होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राहुल गांधींना आत्मपरीक्षणाचा सल्ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्राने एक है तो सेफ है चा नारा आता देशाने देखील हा नारा स्वीकारल्याचे ते म्हणाले. जयपूर डायलॉग या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी ताउम्र गालिब हम यही भूल करते रहे, धूल चेहरे पर थी और हम आइना साफ करते रहै, अशी शेरोशायरी करत राहुल गांधी यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

ते दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस

राहुल गांधी यांचे एक वेगळेपण आहे. तुम्ही कितीही खरे सांगा, ते अजिबात ऐकत नाहीत. ते दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. राहुल गांधी अर्बन नक्षलवाद शक्तींना बळ देण्याचे काम करत आहेत. आमच्या व्यवस्थेतील संस्थांवर अविश्वास व्यक्त करतात. ज्यातून आमच्या लोकशाही व्यवस्थेवर जनतेचा विश्वास उडवण्याचा प्रयत्न अर्बन नक्षलकडून सुरू आहे. त्याला राहुल गांधी बळ देतात, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कार्यकर्त्याला विश्वास देणे महत्त्वाचे

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लोकसभेत राज्यात पराभव झाल्यानंतर विधानसभेसाठी कशी तयारी केली यावरही भाष्य केले. विरोधी पक्षाशी आपण लढू शकतो, हे कार्यकर्त्याला सांगणे गरजेचे होते. आपण हरलो नाही. आपल्याला चांगली मते मिळाली आहेत. 2 कोटी 50 लाख महाविकास आघाडीला मिळाले , तर भाजप 2 कोटी 38 लाख मत मिळाले. आपण जिंकू शकतो असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला, असे ते म्हणाले.

Chief Minister Devendra Fadnavis’ criticism – Rahul Gandhi is the second Munnabhai MBBS: He also revealed the events of 2019

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात