Chhattisgarh : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये १० नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण!

Chhattisgarh

यामध्ये पाच नक्षलवाद्यांवर इनाम जाहीर करण्यात आलेले होते.


विशेष प्रतिनिधी

बिजापूर : Chhattisgarh छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात, पाच इनामी नक्षलवाद्यांसह १० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये नियामगिरी एरिया कमिटी सदस्य अर्जुन मडकम (२०) यांच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते. दरम्यान, पलागुडा जनता सरकारचे उपाध्यक्ष हदमा ताती उर्फ ​​मोराली (३८), नक्षलवादी हुंगा माडवी (४२), भीमा माडवी (३४) आणि नंदा माडकम (४५) यांच्यावर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस आहे.Chhattisgarh

जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘नियाद नेल्ला नार’ (तुमचे चांगले गाव) योजनेमुळे प्रभावित होऊन आणि नक्षलवादी संघटनेच्या विचारसरणीने निराश झाल्यामुळे नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांवर पोलिस पथकावरील हल्ल्यासह अनेक नक्षलवादी घटनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.



पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत त्यांना प्रत्येकी २५,००० रुपये रोख देण्यात आले. ते म्हणाले की, २०२४ मध्ये सुरक्षा दलांनी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ५८ नक्षलवाद्यांना ठार मारले होते. तर १८९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते आणि ५०३ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात १७ नक्षलवादी मारले गेले आहेत आणि २३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तर ४६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

10 Naxalites surrender in Bijapur, Chhattisgarh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात