विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit pawar शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच धनंजय मुंडे + वाल्मीक कराड + संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना “नैतिकता” शिकवली. आज अजितदादांनी बीडमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना चारित्र्य टिकवण्याची दमबाजी केली. पण खरंतर आधी पोसली राष्ट्रवादीतली खलप्रवृत्ती, नंतर केली चारित्र्य टिकवण्याची दमबाजी असेच या गोष्टीचे स्वरूप राहिले.Ajit pawar
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांच्यासमवेत धनंजय मुंडे देखील होते. अजितदादांनी डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली. त्या बैठकीला आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना स्थान देण्यात आले नसल्याची बातमी समोर आली.
पण डीपीडीसीच्या बैठकीच्या आधी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना चारित्र्य टिकवण्याचे आवाहन केले कोणीही हातातले पिस्तूल वर काढू नका. कमरेला लटकवून फिरू नका, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडून लायसन्स रद्द करीन, अशी दमबाजी अजितदादांनी केली. जिल्ह्यामध्ये बदल दिसला पाहिजे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारताना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तेच सांगितले होते. कार्यकर्ते आणि नेत्यांनी देखील उगाचच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या भोवती फिरू देऊ नका. मी हे खपवून घेणार नाही. कोणताही भेदभाव न करता पोलिसांना कारवाई करायला सांगेन, असे अजितदादा म्हणाले. यावेळी धनंजय मुंडे त्यांच्या शेजारी उभे होते.
पण अजितदादांनी आज बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असा दम भरला असला तरी मूळात राष्ट्रवादीतली ही खल प्रवृत्ती गेल्या कित्येक वर्षांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनीच पोसली. ही खल प्रवृत्ती गेल्या वर्षा – दोन वर्षात निर्माण झालेली नाही, तर राष्ट्रवादीची सत्ता असल्यापासून ती “विकसित” होत गेली. तिला नेत्यांचे “पाठबळ” मिळत गेले ही वस्तुस्थिती बदलली नाही. परंतु संतोष देशमुख प्रकरणात सगळ्याच गोष्टी अंगलट आल्यामुळे आपल्याच पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दम भरणे अजितदादांना भाग पडले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App