वृत्तसंस्था
जुबा : South Sudan दक्षिण सुदानच्या युनिटी स्टेटमध्ये बुधवारी विमान कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, हे एक छोटे विमान होते ज्यामध्ये दोन पायलटसह 21 लोक होते. हे विमान चीनी तेल कंपनी ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनीने भाड्याने घेतले होते.South Sudan
युनिटी राज्याचे माहिती मंत्री गटवेच बिपल यांनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता हा अपघात झाला. हे विमान राजधानी जुबाला जात होते. बिपल म्हणाले की, विमानात बसलेले सर्व लोक ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनीचे तेल कर्मचारी होते. मृतांमध्ये दोन चिनी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश असल्याचे बिपल यांनी सांगितले.
विमान अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे
युनायटेड नेशन्स रेडिओ मिरायाच्या रिपोर्टनुसार, हे विमान दक्षिणी सुदानमधील तेलक्षेत्रातून उड्डाण करत होते. विमानात तेल कंपनीशी संबंधित कर्मचारी होते. ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. त्याच वेळी, अधिकाऱ्यांनी अद्याप पीडितांची ओळख उघड केलेली नाही.
दक्षिण सुदानला 2011 साली सुदानपासून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून येथे अनेक विमान अपघात झाले आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये राजधानी जुबाहून रिओलला जाणारे चार्टर्ड विमान कोसळले. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता.
2015 मध्ये, रशियन बनावटीचे एक मालवाहू विमान राजधानी जुबा येथून उड्डाण घेत असताना क्रॅश झाले होते. विमान कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला होता. याचे कारण विमानाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना सामावून घेणे हे होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App