विशेष प्रतिनिधी
बीड : Suresh Dhas धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना कोट्यवधी रुपयांची बोगस बिले उचलली, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. परळी आणि अंबाजोगाई मतदारसंघात 1 रुपयाचेही काम न करता 73 कोटी 70 लाख रुपये उचलण्यात आले, असा दावा सुरेश धस यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.Suresh Dhas
दरम्यान, 30 जानेवारी रोजी बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येलाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बोगस बिले उचलल्याचा आरोप केला. तसेच आपल्याकडे असलेली कागदपत्रे अजित पवारांना देणार असून याबाबत तक्रार करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.
सुरेश धस म्हणाले, मीडियाची मेमरी स्ट्रॉंग असेल तर कोणीतरी कोकणे नावाचे कार्यकारी अभियंता होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिस्तूल मागितले होते. याची चौकशी आता मुख्यमंत्री करत आहेत. सन 2021-22 अंतर्गत यावेळेस धनंजय मुंडे पालकमंत्री होते. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयांचे बिले उचलली.
दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 2 कोटी 31 लाख
दिनांक 18 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता विभाग बीड 10 कोटी 98 लाख
दिनांक 25 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता विभाग अंबाजोगाई 6 कोटी 59 लाख
दिनांक 26 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता विभाग जिल्हा परिषद विभाग बीड क्रमांक 2 16 कोटी 48 लाख
दिनांक 31मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता विभाग जिल्हा परिषद बीड 1 कोटी 34 लाख,
असे एकूण 37 कोटी 70 लाख रुपये या कामांची बोगस बिले. संजय मुंडे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले. ते डेप्युटी इंजिनिअर होते. त्यावेळी त्यांना चार्ज दिला. 25 जून 2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता विभागाचा प्रभारी कार्यभार दिला. त्यांनीही बिले उचलून दिली, असाही आरोप सुरेश धस यांनी केला.
सुरेश धस म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम 2021-22 अंतर्गत जानेवारी 2023 मध्ये सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे होते. दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी, दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी एक कामाचे 1 कोटी 20 लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत काडीचेही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आले आहेत.
रस्ता कामाचे 5 कोटी लाटले
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, अर्थसंकल्पीय कामे हॅम अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले 59 कोटी रुपयांचे रस्त्याचे काम सुरू असून त्यामध्येच 6 कोटी 30 लाख रुपयांचे आणखी एक काम मंजूर करून आणले आणि केल्याचे दाखवले. परळी, पुस, बर्दापूर या रस्त्याचे काम न करता 5 कोटी रुपये बिल उचलले आहे. या कामाची पाहणी केली, तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगितले की 17 मार्च 2022 ला कक्ष अधिकाऱ्यांनी, बांधकाम विभागाने कळवले की, या कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे, तरी सुद्धा यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. यावेळी शिवशंकर स्वामी कार्यकारी अभियंता, संजय मुंडे उप अभियंता आणि अतुल मुंडे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते.
प्रशासकीय मान्यता रद्द, तरी आकांनी बिले उचलली
सुरेश धस म्हणाले, 25 मार्च 2022 रोजी परळी मतदारसंघातील 57 कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द केल्या. प्रशासकीय मान्यता रद्द झाल्यानंतरही आकांनी 57 कामांचे 4 कोटी 43 लाख 45 हजार रुपयांचे बिले उचलून मोकळे झाले. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशी एकूण परळी मतदारसंघात 2021-22 आणि 2023 जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार होते, त्यावेळी त्यातील पहिले 37 कोटी 70 लाख रुपये बोगस बिले उचलली, दुसरे 14 कोटी 46 लाख रुपये आणि 16 कोटी 20 लाख रुपये आणि 5 कोटी बर्दापूर पुसवर असे एकूण 73 कोटी 36 लाख रुपये पहिल्यांदा बोगस बिले उचलली आहेत. एवढी मोठ्या प्रमाणात बोगस बिले महाराष्ट्रात कुठे उचलली गेली नसतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App