विशेष प्रतिनिधी
सांगली : मस्साजोग प्रकरणात तथ्य असल्यास धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री राजीनामा द्यायला लावतील अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
पाटील म्हणाले, मस्साजोग प्रकरणात चौकशी सुरू आहे. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटलं की या प्रकरणात काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील. अद्याप पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे. एसआयटी नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे.
पाटील म्हणाले, वाल्मिक कराडसह आरोपींना मोका लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यात पर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. वाल्मिक कराड याला देखील 302 च्या गुन्ह्यात घेतील .
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसठी उपोषण सुरू केले आहे. यावर पाटील म्हणाले, उपोषण करणं, धरणे आंदोलन करणं हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या वेळी मागण्या मागितले आहेत त्या पूर्ण केल्या आहेत. १८०० विद्यार्थ्यांनी केंद्राच्या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटवर प्रवेश घेतला आहे.
केंद्रात ईडब्ल्यूएस आहे पण महाराष्ट्रात मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये राहता येत नाही परंतु असं असलं तरी त्या विद्यार्थ्यांना या वर्षापुर्ता केंद्राचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मान्य करून प्रवेश दिलं आहे. त्यामुळे आता मागणी मांडा चर्चा करा मार्ग निघेल मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येणं सुरू केलं पाहिजे तसेच शिष्टमंडळासह निवेदन घेऊन चर्चेला आलं पाहिजे व येताना कायदेशीर बाजू माहिती असणारीच लोक आणली पाहिजे .
राज्यात अनेक जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला आहे. यावर पाटील म्हणाले, जिवंत माणसांनाच एखादी गोष्ट आवडते आणि नावडते. त्यामुळे जिवंत माणसांमध्ये रूसवे फुगवे असतात. कुटुंब प्रमुख जसे रुसवे फुगवे संपवतात तसे आमचे कुटुंब प्रमुख दाओसला गेले होते. ते आता परतले आहेत ते रुसवे फुगवे काढतील .
सांगली पोलिसांनी काही दिवसापूर्वी फार मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहेजी जी लोक ड्रगसंबंधी माहिती देतील त्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त केला गेला तर माझ्या सॅलरी अकाउंट मधून दहा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. ड्रग्जची कारवाई केली जातेच, नाही झाली तरी मी रस्त्यावर उतरेन.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App