विशेष प्रतिनिधी
नाशिक : विद्वत शिरोमणी महामहोपाध्याय श्रीमान पंडित देवदत्त पाटील यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने अभिवादन मानपत्र समर्पित करण्यात आले.Devdutt Patil
गोवा रिवण येथील सुब्रमण्यम पाठशाळेचे प्रधानाध्यापक तसेच न्यायशास्त्र, मीमांसा शास्र आदी सकलशास्त्रांचे अभ्यासक विद्वान पंडित देवदत्त पाटील गुरुजी शास्त्रार्थ सभेच्या निमित्ताने श्री क्षेत्र नासिक येथे आले असून त्यांनी आज शास्त्रार्थ सभा संपन्न झाल्यानंतर भगवती गंगा गोदावरी देवीची आरती करण्याची इच्छा प्रदर्शित केली. पंडित वेदमूर्ती रवी शास्त्री पैठणे यांनी त्यांस आमंत्रण देऊन गोदातीरी आणले.
समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी देवदत्त पाटील गुरुजींचे आणि समग्र भारत देशातून आलेल्या अनेक अनेक महान विद्वान पंडितांचे मनःपूर्वक स्वागत केले. महापूजेच्या नंतर श्री पाटील गुरुजी यांना हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नासिककरांच्या वतीने सन्मानपत्र आणि पुष्पहार अर्पण करून गौरविण्यात आले .
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे विश्वस्त आर्किटेक्ट शैलेश देवी, अर्थतज्ञ सौ. कविता देवी यांनी पाटील गुरुजींचे पूजन केले. उपाध्यक्ष नरसिंह कृपादास यांनी माल्यार्पण करून जयंत गायधनी यांनी सन्मानपत्र बहाल केले. समितीचे सचिव श्री मुकुंद खोचे यांनी समस्त विद्वजनांचा परिचय नासिककरांना करून दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ज्याचे मुक्तकंठाने गुणगान गायले असे छोटे विद्वान न्यायशास्री प्रियव्रत पाटील, न्यायशास्त्री राजेश्वर देशमुख, केंद्रीय राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे निर्देशक श्री पांडेजी तसेच न्यायशास्री भार्गवी टेंगसे, न्यायशास्री कुमारी ऋतुजा कुलकर्णी यांसहित अनेक न्यायशास्त्री पंडित मीमांसा व्याकरण आदी जाणणारे अत्यंत मूर्धन्य महान शास्त्री पंडित यावेळी उपस्थित होते. देवदत्त पाटील गुरुजींनी समितीची सगळी माहिती जाणून घेऊन सर्व नासिककर नागरिकांना आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सदस्यांना मनःपूर्वक आशीर्वाद दिलेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App