दिल्ली दारू घोटाळ्यातला पैसा कुठे गेला??; त्यातून निवडणुकीच्या काळात 600 रुपयांचा रोजगार मिळवा!!

Sandeep Dikshi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेला दारू घोटाळ्यातला पैसा नेमका कुठे गेला??, हे इतरत्र शोधू नका. तो निवडणुकीच्या काळातच शोधा. निवडणुकीच्या काळात 600 रुपयांचा रोजगार त्यातून मिळवा!! अशा स्टोरीज आता दिल्लीत फिरू लागल्या आहेत.

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे केंद्रीय राजकारणात जरी इंडी आघाडीत एकत्र असले, तरी दिल्ली विधानसभा निवडणूक ते स्वतंत्रपणे लढवत आहेत. त्यामुळे एकमेकांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची स्पर्धा त्यांच्यात लागली आहे. दिल्लीतल्या दारू घोटाळा आणि त्यातील गेलेला पैसा हा काँग्रेसचे दिल्लीतले मुख्य नेते संदीप दीक्षित यांनी आजच “शोधून” काढला.

दिल्लीतल्या दारू घोटाळ्यातला पैसा कुठे गेला हे तुम्ही इतरत्र शोधू नका. तो दिल्लीच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला रस्त्या रस्त्यांवर दिसेल. दिल्लीत आम आदमी पार्टीचे खरे कार्यकर्ते कुठेच रस्त्यावर उतरून काम करत नाहीत. 90% कार्यकर्ते गळ्यात झाडू चिन्हाचे गमछे घालून फिरत आहेत, ते 600 रुपये रोजंदारीवरचे तरुण आहेत. त्यांना आम आदमी पार्टी रोज 600 रुपये देऊन त्यांच्याकडून प्रचार करून घेत आहे. एकट्या नवी दिल्ली मतदारसंघात असे 5 कोटी रुपये वाटले गेले आहेत. सगळ्या दिल्लीचा हिशेब काढला, तर 300 कोटी रुपये या 600 रुपयांच्या रोजंदारीवर खर्च होणार आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या दारू घोटाळ्यातला पैसा इतरत्र कोठे शोधायची गरज नाही. तो 600 रुपयांच्या रोजंदारीमध्येच पचवला जातोय, असा गंभीर आरोप संदीप दीक्षित यांनी केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे काँग्रेस तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र या आरोपांवर अजून आम आदमी पार्टीने उत्तर दिलेले दिसले नाही. सध्या आम आदमी पार्टीचे टार्गेट काँग्रेस पेक्षा भाजप आहे म्हणून त्या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींसकट भाजपच्या नेत्यांना सध्या टार्गेट करत आहेत.

New Delhi constituency Sandeep Dikshit say

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात