दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा; लाडक्या बहिणी कुणाला तारणार??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होत असून त्यात निवडणूक आयोग दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. पण या घोषणेपूर्वीच आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांनी दिल्लीत लाडक्या बहिणींवर विविध योजनांची खैरात केल्याने त्या लाडक्या बहिणी नेमक्या कुणाला तारणार??, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्यारी दीदी योजनेची घोषणा करत तिथे महिलांना दर महिन्याला 2500 रुपये देण्याची गॅरंटी दिली. प्यारी दीदी योजनेच्या जाहिराती काँग्रेसने आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवर छापल्या. त्याचे व्हिडिओ व्हायरल केले.

भाजप आणि आम आदमी पार्टीने पण अशाच आकर्षक घोषणा करून लाडक्या बहिणींचे मन राखायचा प्रयोग केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत 17000 कोटी रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने आणि उद्घाटने केली.

पण दिल्लीमध्ये प्यारी दीदी म्हणून महिलांना 2500 रुपयाची आशा दाखवणाऱ्या काँग्रेसने महाराष्ट्रात मात्र लाडक्या बहिणीविरुद्ध कोर्टाचे दरवाजे ठोठावले. शिंदे – फडणवीस सरकारने महिलांना पहिल्यांदा 1500 रुपये आणि त्यानंतर 2100 रुपये देण्याची घोषणा केली. मात्र त्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक एजंट आणि सुनील केदार यांचे मित्र मित्र अनिल वडपल्लीवार कोर्टात गेले. लाडकी बहीण योजना फसवी असल्याचा दावा केला. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक हालत बिघडेल, असा आरोप केला.

पण याच काँग्रेसने दिल्लीत मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर येतानाच महिलांना 2500 रुपये देण्याची प्यारी दीदी योजना जाहीर करून त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे फोटो छापले.

आता आज दुपारी 2.00 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीची घोषणा करून प्रत्यक्षात सगळ्या पक्षांच्या परीक्षेला सुरुवात करणार आहे.

Delhi assembly elections announced today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात