विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित ऊसतोड मजूर पुरवणारे मुकादम आहेत. हा योगायोग नाही हेही मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे.हे मुकादम ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली पैसे घेऊन मजूर पुरवत नाहीत. या पैशांची परत मागणी करणाऱ्या 4-5 ऊस वाहतूकदारांचे मारहाणीत खून झालेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरोळ मध्ये एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते.व्यासपीठावर शेजारी बसलो असताना त्यांच्याकडे दोन-तीन मागण्या केल्या आहेत. या मागण्या संदर्भात 12 तारखेनंतर शिष्टमंडळासहित भेटण्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित ऊसतोड मजूर पुरवणारे मुकादम आहेत. हा योगायोग नाही हेही मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. ऊस वाहतूकदारांना ऊसतोड मजुरांच्या मुकादमांनी अक्षरशः लुटलेलं आहे. सांगली, कोल्हापुरात गेल्या 5 वर्षात 2500 मुकादमांवर गुन्हे दाखल आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही उसाचे पैसे मिळालेले नाहीत आणि साखर कारखानदार सातत्याने बैठका घेण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप करून शेट्टी म्हणाले, ऊस तुटल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्याला एफआरपी मिळणे आवश्यक आहे. पण ती मिळत नाहीऊसतोड मजूर, ऊसतोड मशीन मालकांकडून ऊस उत्पादकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. शेट्टी म्हणाले, निवडणुकीत जाहिरनाम्यात संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन महायुतीने दिलं होतं. ते पाळावं. येत्या अर्थसंकल्पात सातबारा कोरा करण्यासाठी आवश्यक रक्कमेच्या तरतुदीचीही मागणी केली आहे
-अलमट्टी उंचीवाढीबाबत केंद्रीय जल आयोगाबाबत महाराष्ट्र सरकारने हरकत नोंदवायला हवी. आत्ताच 519 मीटरला पाणी अलमट्टीत स्थिर झाल्यावर पाण्याचा फुगवटा वाढतो परिणामी 20-20 दिवस कोल्हापूर,सांगली मध्ये नदीला पूर रेंगाळतो.आता अलमट्टीची उंची वाढवली तर हा पूर 35 दिवस रेंगाळू शकतो हे साधं गणित आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अलमट्टीच्या उंची वाढीची परवानगी रद्द करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App