विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकारने आणलेल्या लाडक्या बहिणी विरुद्ध काँग्रेसच्या समर्थकांनी कोर्टबाजी केली, पण आता दिल्ली विधानसभा निवडणूक आल्याबरोबर काँग्रेसला झाली “प्यारी दीदी”!!Court action against beloved sister in Maharashtra; But Congress got “Dear Didi” for election in Delhi!!
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्यारी दीदी योजनेची घोषणा करत तिथे महिलांना दर महिन्याला 2500 रुपये देण्याची गॅरंटी दिली. प्यारी दीदी योजनेच्या जाहिराती काँग्रेसने आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवर छापल्या. त्याचे व्हिडिओ व्हायरल केले.
पण दिल्लीमध्ये प्यारी दीदी म्हणून महिलांना 2500 रुपयाची आशा दाखवणाऱ्या काँग्रेसने महाराष्ट्रात मात्र लाडक्या बहिणीविरुद्ध कोर्टाचे दरवाजे ठोठावले. शिंदे – फडणवीस सरकारने महिलांना पहिल्यांदा 1500 रुपये आणि त्यानंतर 2100 रुपये देण्याची घोषणा केली. मात्र त्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक एजंट आणि सुनील केदार यांचे मित्र मित्र अनिल वडपल्लीवार कोर्टात गेले. लाडकी बहीण योजना फसवी असल्याचा दावा केला. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक हालत बिघडेल, असा आरोप केला.
पण याच काँग्रेसने दिल्लीत मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर येतानाच महिलांना 2500 रुपये देण्याची प्यारी दीदी योजना जाहीर करून त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे फोटो छापले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App