विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपची साथ सोडणार लालूप्रसाद यादव यांच्या आवाहनाला भुलून ते राष्ट्रीय जनता बरोबर दलाबरोबर जाऊन सरकार बनवणार. उद्धव ठाकरे आणि शरद पवार पंतप्रधान मोदींना केंद्र सरकारमध्ये साथ देणार, वगैरे राजकीय अफवांच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या केंद्रीय मंत्र्यांचे एक वेगळेच वक्तव्य सध्या व्हायरल झाले आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे म्हणजे भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेले दुसरे लालूप्रसाद यादव आहेत, असे टीकास्त्र नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे नेते आणि केंद्रीय मंत्री लल्लनसिंग यांनी सोडले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त जनता दल हा पक्ष भाजपबरोबरच राहील. लालूप्रसाद यादव यांच्या आवाहनाला नीतीश कुमार कुठलाच प्रतिसाद देणार नाहीत, असे लल्लनसिंग म्हणाले.
त्याचवेळी ललनसिंग यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल म्हणजे भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेले दुसरे लालू यादवच आहेत. ते एकीकडे दिल्लीत वेगवेगळ्या सेवा योजना चालू केल्याचा दावा करतात, पण बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या लोकांवर ते वेगवेगळे ठपके ठेवतात. उत्तर प्रदेश आणि बिहार मधले लोक पाचशे रुपयांचे तिकीट काढून दिल्लीत येतात आणि पाच लाख रुपयांचे उपचार करून घेऊन निघून जातात किंवा दिल्लीतच राहतात, असे केजरीवाल म्हणतात. दिल्ली काय केजरीवालांची खाजगी प्रॉपर्टी आहे का?? दिल्ली देशाची राजधानी आहे. इथे येऊन कोणालाही राहण्याचा अधिकार आहे!!
नितीश कुमार हे भाजपची साथ सोडणार असल्याच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट आणि परखड शब्दांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडून दिल्लीत नितीश कुमार आणि भाजप एकसाथ असल्याचे दाखवून दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App