विशेष प्रतिनिधी
मुंबई : संतोष देशमुख प्रकरणामध्ये विरोधी पक्षांपैकी सगळे नेते धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करत असताना अजित पवारांचा फारसा उल्लेख करत नव्हते, पण आता शरद पवारांच्या खासदाराने थेट अजितदादांचे नाव घेऊन नवा गंभीर आरोप केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या दिवशी मसाजोग मध्ये देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला आले होते, त्यावेळी त्यांच्या ताब्यात वाल्मीक कराडची गाडी होती. तो त्या गाडीत होता, असा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. त्याचवेळी पोलिसांनी वाल्मीक कराडला का अटक केली नाही??, असा सवाल देखील त्यांनी केला.
संतोष देशमुख प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या पाठोपाठ हा थेट अजितदादांचे नाव आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
शरद पवार मस्साजोग मध्ये येऊन देशमुख कुटुंब यांना भेटले. त्याच दिवशी दुपारी अजितदादा देखील देशमुख कुटुंबीयांना भेटायला गावात आले होते. ते गावात येताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची गाडी देखील होती. त्या गाडीत होता, असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला.
शपथविधीच्या दिवशी वाल्मीक कराड नागपूर मध्ये होता. एका बंगल्यावर सगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यावेळी देखील तो हजर होता, तरी देखील पोलीस त्याला फरार म्हणत होते. नागपूरच्या शपथविधीनंतर वाल्मीक कराडने पुणे – गोवा – पुणे असा प्रवास केला. त्यावेळी पोलिसांना तो का सापडला नाही??, असा सवाल देखील बजरंग सोनवणे यांनी करून संतोष देशमुख प्रकरणामध्ये थेट अजितदादांचे नाव घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य वाढविले.
संतोष देशमुख प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून कायद्याच्या चौकटीत राहून दोषींना फाशीपर्यंत नेण्याची भूमिका घेतली त्यांनी वारंवार पत्रकारांच्या प्रश्नांना तशीच उत्तरे दिली. धनंजय मुंडे यांनी देखील सुरुवातीला पत्रकारांना टाळले असले, तरी नंतर मात्र वाल्मीक कराड विरोधात त्यांना भूमिका घ्यावी लागली, पण या सगळ्यांमध्ये आत्तापर्यंत अजितदादा काहीही बोलले नव्हते. खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड किंवा संभाजी राजे यांनी देखील फक्त सरकारलाच टार्गेट केले होते, पण ते अजितदादांचे नाव घेत नव्हते. आता मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट अजितदादांचे नाव घेतल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढून ते थेट अजितदादांपर्यंत पोहोचले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App