विशेष प्रतिनिधी
बीड : Suresh Dhas आमदार सुरेश धस यांनी बीड येथील मोर्चात भाषण करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. याच्या निषेधार्थ प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आमदार धस यांना माफी मागण्याचे आवाहन केले होते. त्यावर धस यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. यानंतर प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी भेट घेतली. या भेटीनंतर आता आमदार सुरेश धस यांनी माघार घेतली असल्याचे समोर आले आहेSuresh Dhas
आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचे जर मन दुखावले असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हंटले आहे. त्यामुळे या नव्याने सुरू झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसते. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता.
सुरेश धस म्हणाले, मी प्राजक्ताताईसह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे सुरेश धस यांनी म्हटले. दरम्यान, मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कोणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझे बोलणे झाले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत दादांचा मला फोन आला होता. चुकला असला नसला तरीही तू क्षमा मागून टाक असे मला त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मी एक मिनिटांत माफी मागतो असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली असल्याचे सुरेश धस यांनी म्हंटले आहे. माझ्याकडून चुकलेले काही नाही, तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा फोकस हा संतोष देशमुख यांचा झालेला खून, त्याची पुढील प्रक्रिया यावर आहे. माझ्या हातानेच मी ती लिहिलेले आहे, एखादा शब्द इकडे-तिकडे होऊ नये म्हणून मी स्वत:च ते लिहून वाचले आहे. मी ग्रॅज्यूएट आहे, असेही सुरेश धस पुढे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App