Valmik Karad : एक-दोन दिवसांत आरोपींना अटक होईल, वाल्मीक कराडच्या विश्वासू महिलेची चौकशी सुरू; संतोष देशमुख यांच्या भावाची माहिती

Valmik Karad

विशेष प्रतिनिधी

बीड : Valmik Karad धनंजय देशमुख यांनी स्वतःहून सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की सीआयडी आधीक्षकांनी विश्वास दिला आहे की, पुढील एक दोन दिवसांत आरोपींना अटक होईल. तसेच वाल्मीक कराड यांचे निकटवर्तीय ज्योती जाधव यांची देखील सीआयडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.Valmik Karad

धनंजय देशमुख म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की माझ्या भावाचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्या सगळ्यांना अटक व्हावी, ही माझी मागणी आहे. तसेच यावेळी जी काही चर्चा झाली त्यावर सविस्तर उद्या बोलणार आहे. आता बोललो तर अर्धवट माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांना म्हंटले आहे.



दरम्यान, सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु केली आहे. सीआयडीने कराडच्या पत्नीची रविवारी दुसऱ्यांदा चौकशी केली. त्यामुळे कराडवरील मानसिक दबावही वाढला असून बँक खाती गोठावल्यामुळे आर्थिक कोंडी केली आहे. तसेच वाल्मीक कराडकडे पासपोर्ट नसल्यामुळे तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यताही कमी आहे. आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवल्यामुळे वाल्मीक कराड समोर सरेंडरशिवाय आता कोणताही पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाल्मीक कराड लवकरच आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या वाल्मीक कराड सध्या फरार असून त्यांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 11 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आरोपी वाल्मीक कराड 20 दिवसांपासून पोलिसांना सापडलेला नाही. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी कराड हा मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होता. विशेष म्हणजे या वेळी त्याच्यासोबत अंगरक्षक पोलिस कर्मचारीही होता. 13 डिसेंबरपर्यंत तो मध्य प्रदेशातच असल्याचे मोबाइल लोकेशनवरून स्पष्ट झाले, पण नंतर मोबाइल बंद झाल्याने त्याचा शोध लागलेला नाही. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातही वाल्मीक कराडवर संशय आहे.

दरम्यान, पवनचक्की मालकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप आणि संतोष देशमुख प्रकरणात रडारवर असलेल्या वाल्मीक कराड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवल्याने तसेच चौफेर कोंडी झाल्यामुळे वाल्मिक कराड आता पोलिसांसमोर शरणागती पत्कारणार असल्याचे सांगितले जात आहे.

The accused will be arrested in a day or two, investigation into Valmik Karad’s trusted woman begins

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात