वृत्तसंस्था
श्रीहरिकोटा : Sriharikota इस्रो सोमवारी रात्री 9.58 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहांचा उद्देश अवकाशात जोडण्याच्या आणि विभक्त होण्याच्या (डॉकिंग आणि अनडॉकिंग) तंत्रज्ञानाची चाचणी घेणे आहे. स्पॅडेक्स मिशनसह हा जगातील चौथा देश बनेल. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच अवकाशात डॉकिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.Sriharikota
इस्रोचे मुख्य रॉकेट पीएसएलव्ही एसडीएक्स 01 आणि एसडीएक्स 02 हे दोन उपग्रह ४७६ किमी उंचीवर असलेल्या कक्षेत ठेवेल. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या उपग्रहांद्वारे ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ (एसपीएडीईएक्स) केले जाईल.
चंद्रावरील मोहिमांसाठी लाभदायी
ही मोहीम भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. ज्यामध्ये चंद्रावरून माती आणि खडक पृथ्वीवर आणणे, भारतीय अंतराळ स्थानक बांधणे आणि चंद्रावर अंतराळवीर पाठवणे या मोहिमांसाठी लाभदायी ठरेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App