दिसले तुमचे ज्येष्ठ नेत्यांविषयीचे “प्रेम”; शर्मिष्ठा मुखर्जी + मनोहर राव यांनी काढले गांधी परिवाराचे वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश झाल्यानंतर काँग्रेस आणि गांधी परिवाराने जे त्यांच्याविषयी “प्रेम” दाखवून त्यांच्या स्मारका संदर्भात मोदी सरकारची ज्या प्रकारे वाद घातला ते पाहून, दिसले तुमचे ज्येष्ठ नेत्यांविषयीचे “प्रेम”!!, अशा शब्दांमध्ये माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी आणि माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचे बंधू मनोहर राव यांनी गांधी परिवाराचे पुरते वाभाडे काढले.

मनमोहन सिंग कालवश झाल्यानंतर त्यांच्या समाधीला दिल्लीतच स्थान मिळावे यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरला परंतु मोदी सरकारने खर्गे यांना सगळ्या औपचारिकता पूर्ण करून मगच मनमोहन सिंग यांचे स्मारक उभे करता येऊ शकेल, हे सांगितल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकारशी वाद घातला. मोदी सरकार मनमोहन सिंग यांचा अपमान करत असल्याचा दावा केला. काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून मोदी सरकारच्या विरोधात वेगवेगळी कॅम्पेन चालवली.

या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे बंधू मनोहर राव यांनी गांधी परिवार आणि काँग्रेसचे पुरते वाभाडे काढले.

प्रणव मुखर्जी कालवश झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीने साधी शोकसभा घेतली नाही किंवा मुखर्जी यांच्या विषयी आदर आणि सन्मान व्यक्त करणारा शोक प्रस्ताव देखील संमत केला नाही, अशी आठवण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितली. माजी राष्ट्रपती हे पक्षाच्या पेक्षा वेगळ्या भूमिकेत असतात त्यामुळे पक्षाच्या पातळीवर कुठला शोक प्रस्ताव संमत करता येत नाही, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला सांगितले होते, पण के. आर नारायणन हे माजी राष्ट्रपती कालवष झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवून शोक प्रस्ताव संमत केला होता. त्याचे ड्राफ्टिंग बाबांनी केले होते, हे बाबांच्या डायरीतूनच मला समजले, अशी कुस्ती शर्मिष्ठा मुखर्जी यांनी जोडली.

मनोहर राव यांनी देखील पी. व्ही. नरसिंह राव कालवश झाल्यानंतर गांधी परिवाराने त्यांचा कसा अपमान केला, याचे सविस्तर वर्णन केले. दिल्लीत नरसिंह राव यांच्या स्मृतीस्थळासाठी दोन गज जमीन सुद्धा मनमोहन सिंग यांना गांधी परिवाराने देऊ दिली नाही. मनमोहन सिंग यांना गांधी परिवाराच्या हाताखालीच काम करावे लागले. सोनिया गांधी किंवा गांधी परिवारातील कोणीही नरसिंह राव यांचा सन्मान केला नाही. त्यांच्या पार्थिवासाठी काँग्रेसच्या मुख्यालयाचे गेट देखील खोलले नव्हते, याची आठवण मनोहर राव यांनी करून दिली. नरसिंह राव यांच्या स्मारकाला मोदी सरकारने जागा दिल्याचे मनोहर राव यांनी आवर्जून सांगितले.

Gandhi family insulted Pranab Mukherjee and P. V. Narasimha Rao, recount their families

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात