Bangladesh : बांगलादेशने भारताला लिहिले पत्र अन् शेख हसीना यांना परत पाठवण्याची केली मागणी!

Bangladesh

बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये शेख हसीना यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Bangladesh मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकारने भारत सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रात बांगलादेशने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी केली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये शेख हसीना यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. बांग्लादेशमध्ये ऑगस्टच्या अखेरीस सत्तापालट झाल्यानंतर शेख हसीना भारतात आल्या होत्या. मात्र, त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे, की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.Bangladesh



बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सोमवारी माहिती दिली की, त्यांनी शेख हसीना यांना ढाका येथे परत पाठवण्यासाठी राजनयिक संदेश पाठवला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील परराष्ट्र मंत्री तौहीद हुसैन यांनी सांगितले की, “आम्ही भारत सरकारला एक राजनैतिक संदेश पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांना (हसीना) बांगलादेशातील न्यायालयीन प्रक्रियेसाठी ढाका येथे परत पाठवण्यात यावे,” असे म्हटले आहे.

तत्पूर्वी, बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार जहांगीर आलम यांनीही माहिती दिली आहे की, त्यांच्या कार्यालयानेही परराष्ट्र मंत्रालयाला पदच्युत पंतप्रधान हसिना यांच्या प्रत्यार्पणासाठी पत्र पाठवले आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. गृह मंत्रालयाचे सल्लागार जहांगीर आलम यांनी दावा केला आहे की ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात प्रत्यार्पण करार आधीच अस्तित्वात आहे. या करारानुसार शेख हसीना यांना बांगलादेशात परत आणता येईल.

गेल्या ऑगस्टमध्ये, बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि हिंसाचाराच्या दरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी देश सोडला. तेव्हापासून त्या भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. शेख हसीना आणि त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांवर मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहार आणि अटक वॉरंट जारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Bangladesh wrote a letter to India demanding the return of Sheikh Hasina

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात