राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut राज ठाकरे हे भाजपच्या सोबत राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस ,नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दोघांच्या चर्चेत पुन्हा बिब्बा घातला आहे.Sanjay Raut
भाच्याच्या विवाह समारंभात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला होता. मात्र या चर्चेत राऊत यांनी उडी घेतली. ते म्हणाले, ही चर्चा अनेक वर्षापासुन सुरू आहे. त्या चर्चेत माझ्यासारखा माणूस देखील सहभागी असतो. राज ठाकरे यांच्यासोबत देखील मी काम केले आहे. त्यांच्या कुटुंबासोबत मित्रत्वाचं नातं राहील आहे.उद्धव ठाकरे हे देखील माझ्या भाऊ आणि मित्राप्रमाणे आहे. काल ते एकत्र आले याचा नक्कीच आनंद आहे. महाराष्ट्राच ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. मात्र दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. राज ठाकरे हे भाजपच्या सोबत राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस ,नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये, शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे. अशा व्यक्तीसोबत जाणं महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल. राज ठाकरे हे अशा लोकाची भलामण करतात. एकेकाळी आम्ही देखील भाजप सोबत राहिलो हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह आहेत. कुटुंब एकच आहे. अजित पवार, शरद पवार ,रोहित पवार हे एकत्र भेटतात ना . पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असला तरीही भाऊ म्हणून एकत्र येतात. कोकणातले राणे त्यांचा एक मुलगा इकडे तर एक मुलगा तिकडे कुटुंब एक असतं. कुटुंब एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या दृष्टीने जे प्रवाह असतात त्या प्रवाहात आम्हाला वाहत जाता येत नाही. हा सुद्धा विचार महाराष्ट्र ने केला पाहिजे. काय निर्णय घ्यायचा हे उद्धव आणि राज ठाकरे भाऊ आहेत त्यांनी घ्यायचा आहे. त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल .
राऊत म्हणाले, कोणत्याही मंत्र्याला जिल्ह्याच्या विकासासाठी नाही तर मलिद्यासाठी पालकमंत्री पद हवे असते. ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. आपापल्या लोकांना पद मिळावी मलाईदार खाते मिळावी आपला आर्थिक गल्ला भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात.आघाडीच्या किंवा युतीच्या सरकारमध्ये शेवटपर्यंत अशा गोष्टी होत असतात. त्याला कोणीही अपवाद नाही. परभणी मधील पालकमंत्री अ ब क ला मिळालं म्हणून सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येला खरोखर न्याय मिळू शकतो का?मुंबईमध्ये उपनगरात ठाण्याच्या पालक मंत्रीपदा बाबत रस्सीखेच सुरू आहे. कल्याण मध्ये जर एखाद्याला पालकमंत्री पद मिळालं म्हणून मराठी माणसावर अन्याय झाला तो अन्याय भविष्यात दूर होणार आहे का? याचा काही उपयोग नसतो. हा फक्त एक सत्ता आपल्याकडे राहावी त्यानिमित्ताने त्या त्या भागातले सर्व व्यवहारांचे सूत्र आपले हाती राहावे म्हणून पालकमंत्री पद आपल्याकडे राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहे.
राऊत म्हणाले, गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम हवे असते. ते काही नक्षलवादाचा खात्मा करायला नको असतो तर गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत, खाणी आहेत त्या उद्योगातून हजारो, करोडी रुपयांचा मलिदा मिळावा म्हणून पालक मंत्री पद हवे असतं. हे माझं आकलन आहे. याच्यावर कोणी टीका करू शकतो. गडचिरोली, चंद्रपूरमध्ये वनसंपत्तीचा प्रचंड नाश सुरू आहे. त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागाचं पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि असते. म्हणून आतापर्यंत संपादक पत्रकार म्हणून माझं आकलन आहे. तुम्हाला कदाचित ते चुकीचे वाटेल. पण ज्यांना हे पालकमंत्री पद हवे आहेत त्यांच्याशी खाजगीत बोला. त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोला. मुंबईचे पालकमंत्री पद लोढा किंवा अन्य कोणाला मिळाल्यामुळे मुंबईत मराठी माणसाला घर स्वस्त मिळणार आहेत का? मुंबईत मराठी माणसावरचा अन्याय थांबणार आहे का?
गृहनिर्माण खात हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ते कशा करता? त्यांच्या लॉबीतले बिल्डर आहेत त्यांना धन लाभ व्हावा, आपल्याला लाभ व्हावा म्हणूनच, अशी टीका करून राऊत म्हणाले, मुंबईतील चाळीचा, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत. ते सुटणार आहेत का? सोडवले जाणार आहेत का ?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App