विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट टाळून बंडखोर छगन भुजबळ थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. फडणवीसांनी त्यांच्याकडे म्हणे 8 – 10 दिवसांचा वेळ मागितला. त्यामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतला पक्षांतर्गत तेच सोडवता येईना का??, असा सवाल तयार झाला.
छगन भुजबळ यांनी बंडाची भाषा वापरून आता 8 दिवस उलटून गेले. दरम्यानच्या काळात अजित पवार सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी कोणीही भुजबळांशी बोलले नाही किंवा त्यांच्या बंडाची दखल घेतली नाही. छगन भुजबळ हे देखील अजित पवार किंवा बाकीच्या नेत्यांना भेटायला गेले नाही. त्यांनी अजित पवारांना वळसा घालून थेट फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे अजित पवारांच्या पक्ष चालविण्याच्या क्षमतेविषयी दाट शंका तयार झाली.
Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
फडणवीस यांना भेटून आल्यानंतर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस यांनी आपल्याकडे 8 – 10 दिवसांचा वेळ मागितला आहे. ओबीसी समाज नाराज झाला, हे मी समजू शकतो, पण विचार करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी काही वेळ लागेल. त्यामुळे आपणही आपल्या समर्थकांना शांत राहायला सांगू. त्यांच्याशी विचारविनिमय करत राहू, भुजबळ म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App