सिसोदिया म्हणाले, मुद्द्यापासून भटकवण्याचा प्रय़त्न होत आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Kejriwal दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास ईडीला परवाणगी दिल्ली आहे.Kejriwal
अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास उपराज्यपालांनी ईडीला होकार दिला आहे. ईडीने 21 मार्च रोजी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती आणि मे महिन्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
ईडीने आपल्या अंतिम तपास अहवालात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना उत्पादन शुल्क घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून नाव दिले आहे. एजन्सीने म्हटले आहे की केजरीवाल आणि सिसोदिया यांनी 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप असलेल्या साऊथ लॉबीला मदत करण्यासाठी उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मध्ये बदल केले. 100 कोटी रुपयांच्या लाचेपैकी ‘आप’ने गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 45 कोटी रुपयांचा वापर केला होता.
राजधानीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी AAP सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांना अडचणीत आणणाऱ्या घटनाक्रमात लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अबकारी धोरण प्रकरणी खटला चालवण्याची परवानगी ईडीला दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने या महिन्याच्या सुरुवातीला केजरीवाल यांच्यावर अबकारी धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर खटला चालवण्यास उपराज्यपालांकडून परवानगी मागितली होती.
आता या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांचे वक्तव्य समोर आले आहे. ज्यात ते म्हणाले की, जर उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे, तर ईडी त्या मंजुरीची प्रत का दाखवत नाही? ही बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाबासाहेबांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी भाषणबाजी थांबवा आणि ईडीला खटला चालवण्याची परवानगी कुठे आहे ते दाखवा?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App