कारच्या नंबर प्लेटवर आरटीओ टॅग ; भोपाळमध्ये आयकर विभागाचा छापा
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : Bhopal मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छाप्यात 52 किलो सोने आणि 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. भोपाळजवळील मेंदोरीच्या जंगलात उभ्या असलेल्या कारमधून सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागासह 100 पोलिसांच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त केला. ज्या कारमधून सोने आणि पैसे जप्त करण्यात आले, त्या जंगलात उभ्या असलेल्या कारच्या नंबर प्लेटवर आरटीओ टॅग होता.Bhopal
मध्य प्रदेशात दोन दिवसांपासून लोकायुक्त आणि प्राप्तिकराचे धाडसत्र सुरू आहे. आयकर विभागाने 52 किलो सोने आणि 15 कोटी रुपये जप्त केले आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ आणि इंदूरमधील एका बांधकाम कंपनीच्या 51 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले होते. पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कारमधून सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कार ग्वाल्हेरची असून 2020 मध्ये खरेदी करण्यात आली होती.
लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या एका माजी कॉन्स्टेबलच्या घरातून 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली, ज्यात रोख 2.85 कोटी रुपये आहेत. पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, येथील पॉश अरेरा कॉलनीतील माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्या दोन मालमत्तांवर सकाळी छापे टाकण्यात आले. या छाप्यात रोख रकमेशिवाय सोने आणि 50 लाख रुपये किमतीची चांदीही जप्त करण्यात आली आहे. डीएसपींनी सांगितले होते की मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे देखील सापडली आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे. मात्र, सौरभ शर्माचा शोध लागू शकला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी सुमारे एक वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. यानंतर जंगलात एका कारमध्ये एवढी मोठी रक्कम सापडली असून गाडीवर आरटीओ प्लेट होती. अशा परिस्थितीत सौरभ शर्माला अटक झाल्यास मोठे खुलासे होऊ शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App