विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात केलेल्या धक्काबुक्कीत भाजपचे खासदार प्रतापचंद्र सरंगी यांचे डोके फुटले. त्यांच्याबरोबरच भाजपचे दुसरे खासदार मुकेश रजपूत जखमी झाले. संपूर्ण देशभर राहुल गांधींच्या उद्दाम वर्तनाचा निषेध झाला. राहुल गांधी आज संसदेकडे फिरकले देखील नाहीत.
पण समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या मात्र राहुल गांधींच्या समर्थनासाठी पुढे आल्या. इतकेच नाहीतर, त्यांनी प्रताप चंद्र सरंगी यांचे डोके फुटून देखील ते नाटक करत असल्याचा कांगावा केला. प्रताप चंद्र सरंगी यांच्यापेक्षा चांगला अभिनय कोणी करू शकत नाही, असे उद्दाम उद्गार जया बच्चन यांनी काढले.
स्वतः राहुल गांधींनी काल धक्काबुक्कीचे समर्थन केलेच होते खुद्द प्रताप चंद्र सरंगी यांना भेटायला गेल्यानंतर कुछ नही हुआ है, असे उद्दाम उद्गार त्यांनी काढले होते. परंतु, राहुल गांधींवर संसद मार्ग पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झाले. त्यांचे लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद कायद्याच्या कचाट्यात अडकले. त्यामुळे ते आज संसदेकडे फिरकले देखील नाहीत.
पण खासदार जया बच्चन मात्र त्यांच्या समर्थनासाठी पुढे आल्या. उलट त्यांनी प्रताप चंद्र सरंगी यांनाच दोषी ठरवत ते नाटक करत असल्याचा कांगावा केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App