Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत चौफेर फटकेबाजी; व्होट जिहाद, EVM, पवारांवर निशाणा

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Devendra Fadnavis नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही चांगलाच गाजला. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि परभणीतील हिंसाचारावर आज सभागृहात अल्पकालीन चर्चा झाली. त्यात विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. तत्पूर्वी, विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजप आमदार राम शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना प्रत्युत्तर देत सरकारची बाजी स्पष्ट केली.Devendra Fadnavis

विरोधकांनी ईव्हीएमवर व्यक्त केलेल्या शंकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी आधुनिक अभिमन्यू असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी मला टार्गेट केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला मतदान केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. तसेच खुल्या मनाने जनादेश स्वीकारा, असा सल्ला विरोधकांना दिला. आत्मचिंतन करत नाही तोपर्यंत तुमची अशीच गत होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.



नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

EVM वरून विरोधकांवर निशाणा

निकाल आपल्या बाजुने लागला की जनतेचा कौल आणि विरोधात गेला की ईव्हीएमवर आरोप करतात, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. विरोधकांनी फेक नरेटीव्ह फॅक्टरी उभी केली आहे, असा आरोपी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. पण हा फेक नरेटीव्ह उद्ध्वस्त करण्यासाठी मी उभा आहे, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. जनतेने आम्हाला मतदान दिले आणि निवडून आणले, असेही ते म्हणाले.

स्वायत्त संस्थांविरोधात जनमत तयार करणे खरा राजद्रोह

जे संविधान आपण हातात घेऊन फिरतो त्याचा विश्वासघात तुम्ही करत आहात. एक प्रकारे संविधानाने ज्या संस्था निर्माण केल्यात त्यावर अविश्वास व्यक्त केला जातो. स्वायत्त संस्थांविरोधात लोकांमध्ये जनमत तयार करणे, हा खरा राजद्रोह आहे हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आज आपण रोज असे काम करतोय हे योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

मारकडवाडीवर काय म्हणाले फडणवीस?

मारकडवाडीत बॅलेटपेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावण्यात आले, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. लोकांना धमकावल्याची ऑडिओ क्लिप आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. मारकडवाडीवरील शरद पवारांच्या भूमिकेबद्दल मला आश्चर्य वाटले. शरद पवार पहिल्यांदा ईव्हीएमवर बोलले, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला. राम सातपुते सारखा सामान्य कार्यकर्ता पाच वर्ष राबतो. एकट्या मारकडवाडीत 22 कोटींची कामे करतो. त्याला जास्त मते मिळाल्यावर तुम्ही लोकांना धमकावता. हे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. बॅलेटचे वोटिंग घ्यायचे. त्यात मतदान पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. ही कोणती पद्धत आहे? ही कोणती लोकशाही आहे? ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

खुल्या मनाने जनादेश स्वीकारा

8 दिवसांत ईव्हीएम हॅक करून दाखवावे, असे खुले आव्हान निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिले होते. परंतु, एकही राजकीय पक्ष तिथे गेला नाही. तुम्ही ईव्हीएमबाबत बाहेर बोलता, पण निवडणूक आयोगाने आव्हान दिल्यानंतर कुणीही गेले नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही, तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच होत राहील. गालिब ता उम्र यह भूल करता रहा धुल चेहरे पर थी, आईना साफ करता राहा तुम्ही जोपर्यंत तुमचा चेहरा साफ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.

लोकसभेनंतर आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मपरीक्षण केले. पण आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. फेक नरेटीव्ह होता, त्याविरोधात थेट नरेटीव्हने उत्तर देऊ, असे आम्ही सांगितले होते. आम्ही मेहनत केली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अर्बन नक्षलवादावर काय म्हणाले फडणवीस?

अर्बन नक्षलवाद म्हणजे काय, देशाच्या संविधानाचे नाव घ्यायचे, पण देशाच्या संविधानाने तयार केलेल्या यंत्रणा कोर्ट, आरबीआय, निवडणूक आयोग अशा प्रत्येक यंत्रणांबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण करायचा, जेणेकरुन लोकांचा विश्वास निघाला पाहिजे, लोकांना वाटले पाहिजे की, या देशात प्रत्येक संस्था या स्वायत्त उरलेल्या नाहीत, जेव्हा असं होईल तेव्हा काय होईल की लोकं बंड करतील. बंड करतील म्हणजे काय करतील? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचे राज्य या ठिकाणी आणतील. हाच तर प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले फडणवीस?

आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीयेत. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. गेल्या 25-30-40 वर्षे आपण नदीजोड प्रकल्पाची चर्चा करत होतो. आपल्या दुष्काळमुक्तीवर नदीजोड प्रकल्प उपाय आहे. नुसते नदीजोड करून चालणार नाही. जलसंधारण, जलयुक्त शिवाराचेही तेवढेच महत्व आहे. त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाण्याचा उपाय आहे.

मागील अडीच वर्षांत शिंदे यांच्या सरकारमध्ये चार प्रमुख नदीजोड प्रकल्पाला आपण सर्वप्रकारची मान्यता दिली. त्यातील काहींची टेंडरही काढले. यामध्ये वैनगंगा-नळगंगा सारखा प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाण या जिल्ह्यांचे चित्र बदलेल. नारपार आणि गिरणा नदीजोड प्रकल्पामुळे नाशिक आणि जळगावचे चित्र बदलणार आहे. दमनगंगा-वैतरणा-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांमुळे महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीकडे नेण्याचे काम करू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis’ all-out attack in the Assembly; Vote Jihad, EVM, Pawar targeted

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात