खासदार बन्सुरी स्वराज आणि अनुराग ठाकूर यांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shivraj Singh Chouhan डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून संसद भवन संकुलात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या धक्काबुक्कीसाठी भाजपने राहुल गांधींना जबाबदार धरले आहे.Shivraj Singh Chouhan
यासोबतच पक्षाच्या खासदार बन्सुरी स्वराज आणि अनुराग ठाकूर यांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस खासदारांनी संसद मार्ग पोलीस ठाणे गाठले. त्यांनी भाजपविरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसवर सदनात असभ्यतेचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी मुद्दाम खासदारांकडे गेले. ते गुंडांसारखे वागत होते. याप्रकरणी भाजप योग्य ती कारवाई करेल. यासोबतच ते म्हणाले की, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते होण्यासाठी लायक नाहीत.
काँग्रेसच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री शिवराज चौहान म्हणाले, “मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. आज जे काही केले त्याबद्दल ते माफी मागतील असे आम्हाला वाटले होते. पण त्यांनी तसे केले नाही. मला समजले नाही की त्यांनी पत्रकारपरिषद का घेतली ? आज त्यांनी (राहुल गांधी) मकरद्वार येथे केलेल्या आंदोलनातून त्यांचा अहंकार दिसून आला. राहुल गांधी तिथे आले तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाण्यासाठी दुसरी जागा वापरण्यास सांगितले पण ते मुद्दाम तिथे आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App