विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत असताना नव्यांना संधी आणि जुन्यांचा पत्ता कट हा फॉर्म्युला विशेष चर्चेत असून काही जुन्यांचे पुनरागमन हा देखील फॉर्म्युला समोर आला आहे.
भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, जयकुमार गोरे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर या नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची पहिल्यांदा संधी मिळत असून पंकजा मुंडे यांचे 10 वर्षांनंतर पुनरागमन, तर गणेश नाईक यांचे 15 वर्षांनंतर मंत्रिमंडळात पुनरागमन होणार आहे. भाजपचे 21 मंत्री होणार असून सर्वाधिक नवे चेहरे देण्याची संधी त्यामुळेच भाजपला मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही मंत्रिमंडळात पुनरागमन होत आहे
Farmers : दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा, 17 जखमी; उद्या देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चा
त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने प्रताप सरनाईक, योगेश कदम, संजय शिरसाट, भरत गोगावले आशिष जयस्वाल प्रकाश आबिटकर यांना देखील पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तामामा भरणे, इंद्रनील नाईक यांना प्रथमच मंत्रिपदाची संधी दिली आहे.
या सगळ्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात तरी छगन भुजबळ, अब्दुल सत्तार, रवींद्र चव्हाण आदी नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. या सगळ्यांवर त्यांचे पक्ष वेगवेगळी जबाबदारी टाकण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App