विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uday Samant तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर ममता बॅनर्जींकडे देशातील प्रभावी नेत्या आहेत. त्यांच्याकडे क्षमता असल्याचे शरद पवार म्हणाले होते. यावरून शरद पवार यांनी काँग्रेसचा अपमान केला, असे विधान उदय सामंत यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ‘इंडिया’ आघाडी निवडणुका जिंकत नाहीत, हा ठपका शरद पवारांनी ठेवल्याचेही उदय सामंत म्हणाले.Uday Samant
मी ‘INDIA’ युती बनवली होती. आता ते व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी नेत्यांची आहे. जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच या आघाडीचे नेतृत्व करेन, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांन म्हटले होते. उद्धव ठाकरे व समाजवादी पार्टीनेही शनिवारी त्याचे समर्थन केले. त्यातच ममता बॅनर्जी यांच्याकडे ती क्षमता असल्याचे म्हटले. यावरून उदय सामंत यांनी उपरोक्त विधान केले.
शरद पवारांनी व इतर नेत्यांनी ठेवला ठपका
उदय सामंत म्हणाले, ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व गेले पाहिजे असे शरद पवारांनी म्हणणे हा काँग्रेसचा अपमान आहे, अशा शब्दांत आमदार उदय सामंत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडी निवडणुका जिंकत नाहीत. देशातल्या निवडणुकांमध्येही ते अपयशी ठरले आहे. हा ठपका शरद पवारांनी व इतर नेत्यांनी ठेवला असल्याचेही सामंत म्हणाले.
हा काँग्रेसचा झालेला अपमान आहे. त्यामुळे आम्ही या संदर्भात काय बोलणार, असेही ते म्हणाले. राहुल गांधीकडील नेतृत्व काढून आता ते ममता बॅनर्जी यांच्याकडे येणार असेल, तर राहुल गांधी नेतृत्व सांभाळण्यात कमकुवत आहे, असे महाविकास आघाडी दाखवत असल्याचे उदय सामंत म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार?
ममत बॅनर्जींनी व्यक्त केलेल्या इच्छेवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ममता बॅनर्जी या देशाच्या एक प्रभावी नेत्या आहेत. त्यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आज देशाच्या संसदेत त्यांनी जे लोक पाठवलेत ते अतिशय कर्तबगार, कष्टाळू आणि जागरूक आहेत. त्यामुळे त्यांना तसे म्हणण्याचा अधिकार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App