सत्तापालट झाल्यापासून सीरियातील परिस्थिती बिकट आहे.
विशेष प्रतिनिधी
Syria सीरियामध्ये बंडखोर गटाने राजधानी दमिश्कवर ताबा मिळवला आहे. राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असाद यांचे सरकार विरोधी पक्षांनी उलथून टाकले आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मास्कोत आश्रय घेतला आहे.Syria
सत्तापालट झाल्यापासून सीरियातील परिस्थिती बिकट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दमिश्कमधील भारतीय दूतावास अजूनही कार्यरत आहे.हिंदुस्तान टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, दमिश्कमधील भारतीय दूतावास अजूनही सक्रिय आहे आणि सुरक्षित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे. सीरियातील दूतावास भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी उपलब्ध आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, सीरियामध्ये सुमारे 90 भारतीय नागरिक आहेत, ज्यात 14 जण संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना त्यांच्या सुरक्षेची अत्यंत काळजी घेण्यास आणि त्यांची हालचाल कमीत कमी ठेवण्यास सांगितले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी म्हटले की, सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या राजवटीचा पतन ही देशातील लोकांसाठी एक ऐतिहासिक संधी आहे. कारण असाद सरकारने गेल्या 50 वर्षांत हजारो निरपराध सीरियन नागरिकांवर अत्याचार केले आहेत. , त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा जीव घेतला.
अनेक वर्षांच्या हिंसक गृहयुद्धानंतर आणि बशर अल-असद आणि त्यांच्या कुटुंबाच्या दशकांच्या नेतृत्वानंतर बंडखोर गटांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर काही तासांनी व्हाईट हाऊस येथे बायडेन यांनी हे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App