विशेष प्रतिनिधी
बारामती : Ajitdada विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांना मिश्किल टोला हाणला. शरद पवार यांना मी आमदार केले असे म्हणणार नाही, कारण मी त्यावेळी तिसरीत होतो, असे ते पवारांना कोपरखळी मारताना म्हणालेत.Ajitdada
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मनी रामराजे यांना आमदार केल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी फलटण येथे सभा झाली होती. या सभेत त्यांनी अजित पवार यांच्या या विधानाचा समाचार घेतला. साखरवाडी येथील सभेत राज्याचे एक मंत्री आले होते. त्यांनी रामराजे यांच्यावर टीका केली. मी रामराजे यांना तिकीट दिले असे ते म्हणाले. खरे तर ही गंमतच आहे. पक्षाचा अध्यक्ष मी असताना त्यांनी कसे तिकीट दिले? मी स्वतः त्यांना आमदारकीचे पहिले तिकीट दिले.
मंत्रिमंडळातही घेतले. आमचे नशीब चांगले म्हणून ते म्हणाले नाहीत पवार साहेबांनादेखील आम्हीच तिकीट दिले, असे शरद पवार यावेळी अजित पवार यांची खिल्ली उडवत म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला अजित पवार यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले.
तिसरीतील कार्ट कसे कुणाला आमदार करेन?
अजित पवार म्हणाले, रामराजे यांना आमदार केल्याचे सांगितल्यानंतर ते पवार साहेबांना खटकले. ते म्हणाले हा उद्या म्हणेल बारामतीचाही आमदार मीच केला. पण मी तसे म्हणणार नाही. मी एवढा वेडा नाही. पवार साहेब आमदार झाले तेव्हा मी तिसरीत होतो. मग तिसरीतील कार्ट कसे कुणाला आमदार करेन.
सत्ता असताना जमिनीवर पाय अन् डोके शांत ठेवायचे असते
दुसरीकडे, शरद पवार यांनी सोमवारी भोर येथील सभेतही अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले, भोरमध्ये येऊन काही लोक (अजित पवार) सांगतात, साखर कारखाना चालवता आला नाही म्हणतात. दोन दिवसांपूर्वी मी शिरूर विधानसभेत होतो. तिथेही ते असेच म्हणाले. साखर कारखाना कसा चालवतो हे मी बघतो, अरे तुम्ही उपमुख्यमंत्री झालात, सत्ता तुमच्या हातात आली, सत्ता हातात आल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात, डोके शांत ठेवायचे असते, संकटात असणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, उलट हे दमदाटी करत आहेत.
ठीक आहे, सत्ता हातात आहे, त्याचा असा गैरवापर तुम्ही करत आहात. पण तुमच्या या भाषेला आणि दमदाटीला मतदार अजिबात भीक घालणार नाही. यांचा निकाल आपल्याला वीस तारखेला घ्यायचा आहे, असे शरद पवार म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App