विशेष प्रतिनिधी
नांदेड : Ashok Chavan भाजप नेते अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी केली होती. यावर अशोक चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. मी संधीसाधू तर मग पवार साहेब कोण आहेत? याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, असा पलटवार अशोक चव्हाण यांनी केला आहे.Ashok Chavan
अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवार नेमकं काय म्हणाले हे मला माहीत नाही, पण शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या लहान माणसावर वक्तव्य केले असेल असे मला वाटत नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हणले आहे. मी जर संधीसाधू आहे, तर मग पवार साहेब काय आहेत? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा शरद पवार यांनी द्यावे, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी पलटवार केला आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे यांच्या पाडण्याच्या भूमिकेवरही अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. अशोक चव्हाण म्हणाले, हे लागू कोणाला होते, ज्यांनी अन्याय केला असेल त्यांना लागू होते. ज्यांनी समाजासाठी काम केले, त्यांना मदत करा ही भूमिका आहे आणि जरांगे यांच्या भूमिकेबद्दल मी सकारात्मक पद्धतीने बघतो. मी सामाजिक आरक्षणासाठी भूमिका घेतली, सभागृहात विषय मांडले, त्याचा पाठपुरावा केला, या सर्व गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना मदत केलीच पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, नांदेड उत्तर मतदारसंघातून ठाकरे गटाचे संगीता पाटील डक तसेच कॉंग्रेसकडून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवारांनी अब्दुल सत्तर यांना पाठिंबा दिला आहे, तर उद्धव ठाकरे यांनी संगीता पाटील डक यांना पाठिंबा दिला आहे. यावर अशोक चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही, त्यामुळे यांचा नुसता गोंधळ चाललाय आणि असाच गोंधळ राज्यपातळीवर झाला तर, आपण राज्याचा काय विचार करणार.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App