विशेष प्रतिनिधी
अकोले : Supriya Sule माझी वैयक्तिक लढाई कोणाशी नाही; पण अविचाराने वर्तणूक करणाऱ्यांच्या विरोधात ती कायम राहील. जोपर्यंत राजकीय पक्षांकडून तरुण पिढी पुढे आणली जात नाही, तोपर्यंत ते पक्ष मोठे होत नाहीत. खरंच बहाद्दर असाल, तर कमकुवत नव्हे, तर ताकदीच्या लोकांशी लढा. पण अजूनही यांना शरद पवार यांची ताकद समजलेली नाही. लढतील, मोडतील पण दिल्लीच्या तख्तासमोर शरद पवार कधीच वाकणार नाहीत. सशक्त लोकशाहीत विरोधक असले पाहिजेत. पण ते दिलदार विरोधक पाहिजेत. महाराष्ट्रात सुरू असलेले गलिच्छ राजकारण आपल्याला बदलायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
अकोल्यात मविआच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अमित अशोकराव भांगरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अकोले बाजारतळावर आयोजित सभेत खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीता भांगरे, दिलीप भांगरे, शेतकरी नेते दशरथ सावंत, मधुकरराव नवले, माकपचे नेते कॉम्रेड डॉ.अजित नवले, भाजपचे नेते कॉम्रेड कारभारी उगले, कॉम्रेड लक्ष्मण नवले आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, सुप्रीम कोर्टात आजही राष्ट्रवादीची केस चालू आहे. पण आता येथे येताना मला रस्त्यात जे चिन्ह दिसले, तेथे कंसात न्यायप्रविष्ठ असे लिहिलेले दिसले नाही. त्याच्यावर त्यांना मी न्यायालयात खेचणार आहे. ज्यांनी तुमच्या विरोधात निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल केले, त्यांनी संगमनेर येथे महिलांसंबंधी गलिच्छ व घाणेरडी व्यक्तव्ये केली. त्यावर अजूनही भाजपने निषेध व्यक्त केला नाही. तसा निषेध ते करणारही नाही. कारण महायुतीतील सर्वजण केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करून आरामात बसले आहेत. मी आरे ला का रे म्हणणारी नाही. मी आहे, ते सहन करते. कारण माझ्यावर चांगले संस्कार झाले. राज्यात सर्वत्र आमच्या आया-बहिणींच्या अब्रूचे धिंदवडे काढत आत्याचार होत आहेत. सोयाबीन, कांद्याला, दुधाला भाव मिळत नाही. कोणी तोंडातून शब्द काढायला तयार नाही, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, हे सरकार खोके सरकार आहे. पण खोके म्हणजे काय ते मला माहीत नाही. पण अकोल्याला ते माहीत असेल. राज्यातील हे महायुतीचे सरकार असंवैधानिक आहे, असेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App