विशेष प्रतिनिधी
खामगाव : Dilip Sananda बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काॅंग्रेसची उमेदवारी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे आकाश फुंडकर यांच्याविराेधात ते रिंगणात उतरले आहेत. मात्र, 2019 च्या निवडणुकीत ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे कारण देत माघार घेऊन रणांगणातून पळ काढणाऱ्या सानंदा यांचा पुन्हा ईव्हीएमवर विश्वास कसा बसला अशी चर्चा मतदारसंघात आहे.Dilip Sananda
तीन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतून अधिकृतरित्या माघार घेतली हाेती. काँग्रेसच्या पहिल्या यादीतच त्यांच्या नावाची घोषणा होणार होती. मात्र त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटून ईव्हीएमवर शंका असल्यामुळे मी निवडणूक लढणार नसल्याचे पक्षाला कळवले हाेते. यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून उमेदवारीसाठी फिल्डींग लावली. त्यांच्यात हा बदल का घडला, यामागच्या कारणांची चर्चाही रंगली आहे. खोटे दस्त तयार करुन कट रचत शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी सानंदा, त्यांच कुटुंब आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले हाेते. त्याला घाबरूनच सानंदा यांनी गेल्या निवडणुकीतून माघार घेतली हाेती. त्यावेळी काॅंग्रेसची उमेदवारी घेऊन ज्ञानेश्वर पाटील रणांगणात उतरले हाेते. मात्र, यावेळी काॅंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. Dilip Sananda
विशेष म्हणजे राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा ही बुलढाणा ) जिल्ह्यातून गेली. त्यावेळेला दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपकाही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चाही हाेती. अशा माणसाला पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने काॅंग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचे चित्र आहे. सानंदा यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही चांगलेच अडचणीत आणले हाेते. सावकारीच्या प्रकरणामुळे दिलीप सानंदा हे देशभरात वादग्रस्त ठरले होते. याच प्रकरणात कारवाई शिथिल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याच्या आरोपांमुळे विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रिपददेखील पणाला लागले होते. तरी देखील काॅंग्रेसने सानंदा यांच्यावर विश्वास ठेवल्याने मराठा समाजातही नाराजी पसरली आहे.
मनोज जरांगे समर्थक धनंजय देशमुख यांनी खामगाव मतदार संघात लढण्याची तयारी केली हाेती. परंतु, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. एका बाजुला सानंदा यांच्यावर नाराजी असताना भाजपचे उमेदवार आकाश फुंडकर यांच्यासाठी संपूर्ण भाजप कामाला लागल्याचे चित्र आहे. याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फुंडकर यांच्या माध्यमातून खामगाव विधानसभा मतदारसंघातील 2365 कोटींंचा निधी मंजूर केला आहे. बोलबच्चन देणारे नेते-आमदार खूप पाहिले, मात्र दिलेले वचन पूर्ण करून दाखवणारे केवळ आकाश फुंडकर आहेत.
खामगाव शहराला पाणी मिळाले पाहिजे अशी मागणी फुंडकर यांनी केली होती, त्या पत्रावर सही करूनच इथे आलो आहे. आपल्या सरकारने 2014 साली जीगाव प्रकल्पाला चालना दिली. या प्रकल्पाला 7 हजार कोटी दिले, ज्याचे काम अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे नेत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून खामगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनने पाणी पोहचणार, असल्याचे आश्वासनही दिले हाेते. २०१९ च्या निवडणुकीत आमदार आकाश फुंडकर यांना ९० हजार ७७५ मते मिळाली होती. त्यांचा १६९६८ मतांनी विजय झाला होता. दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना ७३ हजार ७८९ मते मिळाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App