विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर मध्य येथील उद्धवसेनेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेत पक्षाला धक्का दिला. त्यांचे जवळचे मित्र प्रदीप जैस्वाल हे इथून शिंदेसेनेचे आमदार आहेत. दोन्ही शिवसेनेच्या मतांचे विभाजन होऊन एमआयएमच्या मुस्लिम उमेदवाराला लाभ होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतल्याचे तनवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यामुळे उद्धवसेनेने तनवाणी यांचे महानगरप्रमुखपद तातडीने काढून घेतले.Chhatrapati Sambhajinagar
त्यांच्या जागी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. 2014 मध्ये तनवाणी भाजपकडून, तर जैस्वाल शिवसेनेकडून लढले होते. प्रदीप जैस्वाल यांना 41,861, तनवाणी यांना 40,770 मते पडली होती. हिंदू मतांचे विभाजन झाल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील 61,843 मते घेऊन विजयी झाले होते. यंदाही तसाच पेच निर्माण झाला आहे. दोघांच्या भांडणात मुस्लिम उमेदवाराचा विजय होऊ नये म्हणून माघार घेत असल्याचे सांगत तनवाणी यांनी सांगितले. या मतदारसंघातून एमआयएमचे नासेर सिद्दिकी उमेदवार आहेत.
चोपड्यातही उमेदवार बदलला
उद्धवसेनेने चोपड्यातील उमेदवार राजू तडवी यांना जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून तिथे भाजपमधून आलेले प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी दिली. 2019 मध्ये इथून शिवसेनेच्या लता सोनवणे आमदार होत्या. नंतर त्या शिंदेसेनेत गेल्या. त्यांच्या जातप्रमाणपत्रामुळे त्या अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे शिंदेसेनेने त्यांचे पती चंद्रकांत सोनवणेंना उमेदवारी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App