Maharashtra Assembly Election 2024 : सत्तेसाठी महाविकास आघाडीची चाल!

Maharashtra Assembly Election 2024

विशेष प्रतिनिधी 

Maharashtra Assembly Election 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी रणनीती अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. जातीय समीकरणे, धार्मिक ध्रुवीकरण आणि लोकसभा निवडणुकीत झालेला मतदानाचा पॅटर्न लक्षात घेऊन महाविकास आघाडीने धोरण आखण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने एक गठ्ठा मतदान केले. लाखा लाखाच्या फरकाने पुढे असलेल्या महायुतीच्या जागा एका विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बहुल मतदारांनी एक गठ्ठा विरोधात मतदान केल्यामुळे पडल्या. धुळे, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई अशा अनेक जागा या पॅटर्नचे उदाहरण आहेत. आता याच एकगठ्ठा मतांसाठी महाविकास आघाडीने भविष्यात मुस्लिम उपमुख्यमंत्री करण्याचे जवळपास निश्चित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. Maharashtra Assembly Election 2024

मुस्लिम मतदार कधीही भाजपला मतदान करीत नाही, असं काही जणांच म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीत ते स्पष्टपणे दिसूनही आले आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीत सुद्धा हा पॅटर्न कायम राहिला. मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने थेट मतदान करतो हे देखील विधानसभा निवडणुकीत देखील दिसून आले.

जम्मू आणि काश्मीर या भागात काँग्रेसचा एकही आमदार हिंदू किंवा बौद्ध धर्मीय नाही. निवडून आलेले सहापैकी सहा आमदार हे मुस्लिम समाजाचे आहेत. हरियाणामध्येही मुस्लिम मतदारांच्या एकगठ्ठा मतदानामुळेच काँग्रेस 36 जागा गाठू शकली. नुह, पूनाहाना, हथिन या मुस्लिम बहुल मतदारसंघात काँग्रेसला छप्पर फाड मते मिळाली. हाच पॅटर्न पुढे कायम राहण्याची शक्यता राजकीय जाणकारांतून व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना भाजपचे नेते अमित मालवीय म्हणाले की, ” काँग्रेस ही नवी मुस्लिम लीग झाली आहे. हिंदूंना काँग्रेसमध्ये आणि काँग्रेस सोबत कसलेही भविष्य नाही”.



हरियाणामध्ये काँग्रेसने हिंदू मतांमध्ये जातीच्या आधारावर विभागणी करण्याचा प्रयत्न केला. जाट, दलित आणि मुस्लिम अशी मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र भाजपने तो हाणून पाडला. जाट आणि दलित बहुल भागात देखील भाजपला चांगले मतदान झाले. केवळ मुस्लिम मतदानामुळे काँग्रेसचे आव्हान शाबूत राहिले. जम्मूमध्ये हिंदू बहुल भागाने भाजपला प्रचंड साथ दिली. काश्मीर खोऱ्यात मात्र मुस्लिम बहुल भाग हा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सोबतच राहिला. हा अनुभव लक्षात घेता काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील मुस्लिम मतांवर डोळे ठेवणार असा भाजपच्या पंडितांचा अंदाज आहे.

महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांचे धोरण आहे काँग्रेस सारखेच राहिलेले आहे. उद्धव ठाकरे यांचा हिंदू मतदार एकनाथ शिंदेंकडे वळलेला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनाही मुस्लिम मतांवरच अवलंबून राहावे लागत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटावर केली जात आहे. ठाकरे यांचे प्राबल्य असलेल्या मुंबई शहरात लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायानेच मशाल अधिक खांद्यावर घेतल्याची टीकाही ठाकरेंवर झाली. Maharashtra Assembly Election 2024

मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, वांद्रे पूर्व, मुंबादेवी, भायखळा या मुस्लिम बहुलपट्ट्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अधिक मतदान झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही भिवंडीत तोच अनुभव आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही भविष्यात मुस्लिम मतांवरच विसंबून राहावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

काही महिन्यांपूर्वीच काही मुस्लिम नेत्यांनी काँग्रेसमध्ये आपल्या समाजाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी केली. महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत 40 जागा मुस्लिम समाजाला द्यायला हव्यात, अशीही त्यांची मागणी होती. आपला हक्काचा मतदार एम आय एम किंवा वंचित बहुजन आघाडीकडे सरकू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. उद्धव यांचे हेच धोरण विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे.

राम मंदिराची कुचेष्टा, हिंदू देव देवतांचा जाहीर व्यासपीठावर अवमान, वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध, रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी, आमदार नितेश राणे यांच्या अटकेची मागणी ही महाविकास आघाडीच्या अंगलट येईल असे बोलले जात आहे. परिणामी उपमुख्यमंत्री पद मुस्लिम समाजाला देण्याची महाविकास आघाडीच्या रणनीती निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Assembly Election 2024

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात