Congress : शेतकरी आंदोलनाच्या वातावरणाचा काँग्रेसला लाभ नाही उठवता आला, हुड्डा अति बुद्धीहीन; शेतकरी नेत्यानेच खोलली काँग्रेसची पोल!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये किसान आणि पहिलवानांचा मोठा बोलबाला होता. या दोन्ही आंदोलनांमध्ये उभारलेल्या शक्तींनी काँग्रेसला सगळीकडून भरपूर इंधन पुरवठा केला होता. परंतु, प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्याचा काहीही लाभ उठवता आला नाही. याची पोलखोल एका शेतकरी नेत्यानेच केली. भूपेंद्रसिंग हुडा हे तर अति बुद्धीहीन नेते असल्याची टीका शेतकरी आंदोलनातले नेते गुरुनाम सिंग चढूनी यांनी केली. The farmer leader himself opened the polls of Congress

हे तेच गुरुनाम सिंग चढूनी आहेत, जे हरियाणा मध्ये शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांनी संयुक्त किसान मोर्चा पार्टी या पक्षाच्या तिकिटावर पिहोनी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिथे त्यांना फक्त 1170 मते मिळाली.

मात्र गुरुनाम सिंग चढूनी काँग्रेसची पुरती पोलखोल केली. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने हरियाणा शेतकऱ्यांनी मोठी वातावरण निर्मिती केली होती. परंतु, त्या वातावरणाचा काँग्रेसला लाभ उठवता आला नाही. भूपेंद्र सिंग हुड्डा हे तर अति बुद्धीहीन नेते आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये ते प्रभावहीन विरोधी पक्षनेते ठरले. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगले काम केले नाही. काँग्रेस हायकमांडने त्यांना पुन्हा विरोधी पक्षनेते पदाची संधी देता कामा नये, असे गुरुनाम सिंग चढूनी म्हणाले.

शेतकरी आंदोलनाच्या एका नेत्याने अशी पोलखोल केल्यामुळे काँग्रेस आणि शेतकरी आंदोलन दोन्ही “एक्स्पोज” झाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या हिताशी किंवा त्यांच्या मागण्यांशी काहीही संबंध नव्हता, तर केवळ भाजप सरकारला केंद्रातून आणि वेगवेगळ्या राज्यांमधून उखडून टाकण्याचाच तो फक्त डाव होता, अप्रत्यक्षपणे गुरुनाम सिंग चढूनी यांच्या तोंडातून बाहेर आले.

The farmer leader himself opened the polls of Congress

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात