आजोबांची 33 वर्षांपूर्वी थेट पंतप्रधान पदाला गवसणी; आता नातवाला त्यांच्या वाढदिवशी निवडून आणायचेत आमदार पंच्यायशी!!

Rohit pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rohit pawar  आजोबांची 33 वर्षांपूर्वी थेट पंतप्रधान पदाला गवसणी; आता नातवाला त्यांच्या वाढदिवशी निवडून आणायचेत आमदार पंच्यायशी!!, ही महाराष्ट्रातल्या आजोबा आणि नातवाच्या राजकारणाची कहाणी आहे. ती खुद्द नातवानेच एका मुलाखतीत सांगून टाकली.Rohit pawar

शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 85 आमदार निवडून आणून त्यांना विशेष भेट द्यायचा मनसूबा बोलून दाखविला. शरद पवार 85 वर्षांचे होणार आहेत. त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे 85 आमदार निवडून आले पाहिजेत, अशी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची मनापासूनची भावना आहे, असे रोहित पवारांनी झी 24 तासच्या “टू द पॉईंट” नावाच्या मुलाखतीत सांगितले. रोहित पवारांनी 2024 च्या विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे टार्गेट 85 आमदारांवर सेट केले.



बरोबर 33 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 मध्ये याच शरद पवारांनी ते 51 वर्षांचे असताना थेट पंतप्रधान पदाला गवसणी घातली होती. तेव्हा ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते. राजीव गांधींचे हत्या झाल्यानंतर महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करायची संधी आहे, असा नॅरेटिव्ह चालवत पवारांनी महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली होती. सगळ्या महाराष्ट्राने पवारांच्या प्रचाराला साथ देत त्या वेळच्या अखंड काँग्रेसचे तब्बल 36 खासदार निवडून दिले होते, तर काँग्रेसचे 235 खासदार निवडून आले होते. त्या संख्याबळावरच तर पवारांनी आपली हॅट पंतप्रधान पदाच्या रिंग मध्ये टाकली होती. त्यावेळी त्यांची दिल्लीत प्रतिमा “मराठा स्ट्रॉंग मॅन” अशी बनली होती. पण हे “मराठा स्ट्रॉंग मॅन” आंध्र प्रदेशच्या “तेलगू बिड्डा”समोर पूर्ण पराभूत झाले. नरसिंह रावांनी पवारांवर मात करून पंतप्रधानपद पटकावले होते.

त्यानंतर दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या नद्यांमधून भरपूर राजकीय पाणी वाहून गेले. अनेक नेते राष्ट्रीय पातळीवर मोठे कर्तृत्व गाजवून इतिहासजमा झाले. पण पवार आता आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे नातू आमदार रोहित पवारांनी महाराष्ट्रात पक्षाचे 85 आमदार निवडून आणायचे टार्गेट सेट केले आहे.

Rohit pawar set target of 85 MLAs of NCP SP!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात