Amit Shah : अमित शाह यांनी घेतली नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर झालेल्या चकमकीची माहिती

Amit Shah

छत्तीसगडमधील ही सर्वात मोठी चकमक असल्याचे बोलले जात आहे


विशेष प्रतिनिधी

रायपूर :Amit Shah छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर शुक्रवारी रात्री उशीरा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडमधील ही सर्वात मोठी चकमक असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने शोधमोहीम राबवली जात आहे.Amit Shah

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात एलएमजी रायफल, एके 47 रायफल, एसएलआर रायफल, इंसास रायफल, कॅलिबर 303 रायफल आणि इतर शस्त्रे जप्त केली आहेत. शोधमोहीम सुरू असून सीआरपीएफ आणि डीआरजीचे अतिरिक्त दलेही लक्ष ठेवून आहेत.



राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील या चकमकीची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या ३१ नक्षलवाद्यांबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी काल रात्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्याशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण ऑपरेशनची माहिती घेतली असून पुढील योजना जाणून घ्यायच्या आहेत, असे सांगण्यात येत आहे. ज्या भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली त्या भागात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

Amit Shah took the information about the encounter on Narayanpur-Dantewada border

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात