विशेष प्रतिनिधी
सांगली : विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. परंतु आपण पक्ष संघटनेशी आणि विचारप्रणालीशी एकनिष्ठ असल्याने ती ऑफर नाकारली, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. गडकरींना नेमकी कोणी ऑफर दिली??, ही ऑफर शरद पवार, सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरे यांनी दिली होती का??, दिली असल्यास का दिली??, वगैरे चर्चांचा महापूर महाराष्ट्रात आला. Sharad pawar decline nitin gadkari statement of PM post offer
या संदर्भात काँग्रेसचे कुठले नेते फारसा खुलासा करायच्या फंदात पडले नाहीत. उद्धव ठाकरे स्वतः त्या विषयावर काही बोललेच नाहीत. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनीच प्रतिक्रिया व्यक्त केली, पण सांगलीमध्ये मात्र शरद पवारांना गडकरींना दिलेल्या पंतप्रधान पदाच्या ऑफर संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी हात झटकून टाकले.
Jaishankar : परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानला जाणार, 15-16 ऑक्टोबरला SCO बैठकीत सहभागी होणार
लोकसभेत आता विरोधी पक्षांकडे बहुमत नाही. त्यामुळे कोणाला पंतप्रधानपद देण्याची ऑफर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी गडकरींचा दावा फेटाळून लावला. त्याचवेळी त्यांनी गडकरींच्या कामाची स्तुती देखील केली. महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात गडकरींनी योग्य मत व्यक्त केल्याची मखलाशी पवारांनी केली.
पण गडकरींनी पंतप्रधान पदाच्या ऑफर संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटावर काँग्रेसचे कुठले नेते फारसे बोलले नाहीत. उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. परंतु, पवारांना मात्र त्या वक्तव्यावर हात झटकावे लागल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दाट संशय निर्माण झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App